Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Collective suicides due to pressure from homeowners to pay money

घरमालकाने पैसे देण्याचा दबाव आणल्याने सामूहिक आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Apr 01, 2019, 10:39 AM IST

मृत नागपुर जिल्ह्यातील, आज होणार अंत्यसंस्कार

  • Collective suicides due to pressure from homeowners to pay money

    भडगाव (जि. जळगाव) - जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी घरमालकासह त्याच्या जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना ३ एप्रिलपर्यंत पोलिस काेठडी मिळाली दिले आहे. मुलाच्या खुनाच्या तपासासाठी घरमालकाला १५ हजार रुपये दिल्यानंतही तो वारंवार पैशांची मागणी करत असल्याने सामूहिक आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.


    बब्बू सय्यद असे भाडेकरूचे तर इलियास बेग मालकाचे नाव आहे. साजिद हा इलियासचा जावाई आहे. २२ मार्च रोजी येथील टोणगाव भागातील रहिवासी इसम बब्बू सय्यद या बालकाची हत्या करण्यात आली होती. या खुनाचा पोलिस तपास करत होते. या दरम्यान मुलाच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी घरमालक इलियास बेगने १५ हजार रुपयांची मागणी बब्बू सय्यदकडे केली. त्यानुसार त्यांनी १५ हजार रुपये इलियास व साजिदकडे दिले. त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी करीत होता. “यापूर्वी इलियासने १ लाख २० हजार रुपये उसनवार घेतले आहेत. ते अद्याप परत केलेले नाही. म्हणून मी येथे थांबलो अन्यथा २ महिन्यांपूर्वीच मी भडगाव सोडून जाणार होतो. गेलो असतो तर मुलाचा मृत्यू झाला नसता. इसम घटनेच्या दिवशी कुणासोबत गेला होता. हे बेगला माहीत असूनही सांगितले नाही. उलट मी दुःखात असताना माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते, असे वडील बब्बू यांनी अापल्याला सांगितल्याने त्यांचा मुलगा नाहिदने पोलिसांना सांगितले. ही सांगितलेली सर्व हकिकत व सुसाइड नोटमधील माहिती मिळतीजुळती दिसून येत आहे, असे त्याने सांगितले.

Trending