आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये आढळले निपाहचे रुग्ण, 23 वर्षीय विद्यार्थ्याची टेस्ट पॉझिटिव्ह; सरकारचा अधिकृत दुजोरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे / कोच्ची - केरळमध्ये जीवघेण्या निपाहचे रुग्ण आढळले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी यासंदर्भात मंगळवारी अधिकृत दुजोरा दिला आहे. 23 वर्षीय विद्यार्थ्यामध्ये निपाहची लक्षणे आढळून आली होती. यानंतर त्याचे रक्त चाचणीसाठी पुण्यातील NIV अर्थात नॅशनल इस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले होते. पुण्यातील प्रयोगशाळेने घेतलेल्या चाचणीमध्ये युवकाला निपाहची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.


के.के. शैलजा यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती जाहीर केली. यापूर्वी मनिपाल आणि केरळच्या प्रयोगशाळांमध्ये सुद्धा चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये युवकाच्या रक्तात निपाहचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतरच पुढील चाचणीसाठी सॅम्पल पुण्यात पाठवण्यात आले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मंगळवारी सकाळीच चाचणीचे निकाल समोर आले आहेत. तसेच रुग्णाला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

गतवर्षी याच महिन्यात झाली होती 22 जणांना लागन
केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे. निपाहशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सज्ज आहे असे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या वर्षी मे महिन्यात कोझीकोडे आणि मल्लापुरम येथे निपाहचे 22 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 12 जणांचा उपचारादरम्यान जीव गेला. तेव्हापासूनच या व्हायरसची देशभर दहशत पसरली.

बातम्या आणखी आहेत...