आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसाद आणायला गेली होती तरुणी, मंदिराबाहेर उचलून नेले 4 नराधमांनी; गँगरेप करून फेकले गावाबाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बीएस्सीच्या विद्यार्थिनीवर गँगरेपची घटना समोर आली आहे. 5 दिवसांपासून बेपत्ता विद्यार्थिनीवर नराधमांनी गँगरेप करून तिला गावाबाहेर फेकून दिले. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ती सध्या आयसीयूमध्ये आहे. सूत्रांनुसार, विद्यार्थिनी गावातीलच एका मंदिरात भंडाऱ्याचा प्रसाद आणण्यासाठी गेली होती. तेव्हा परिसरातील चार तरुणांनी तिला उचलून नेले. मग गँगरेप करून तिला विषारी पदार्थ खाऊ घातला आणि नंतर तिला गावाबाहेर फेकून पसार झाले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  

 

- मिळालेल्या माहितीनुसार, सचेंडी गावातील रहिवासी विद्यार्थिनी गत सोमवारी संध्याकाळी गावातीलच काही महिलांसोबत पंच मंदिरात भंडाऱ्याचा प्रसाद आणण्यासाठी गेली होती.
- मंदिरातील गर्दीमुळे महिला माघारी गेल्या, परंतु विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेत होते, पण त्यांना यश आले नाही.
- पाचव्या दिवशी शुक्रवारी मध्यरात्री गावातीलच काही जणांनी कुटुंबीयांना माहिती कळवली की, तुमची मुलगी गावाबाहेर बेशुद्धावस्थेत पडलेली आहे.

 

बेपत्ता बहिणीची माहिती मिळताच धावला भाऊ
- गावकऱ्यांचा निरोप ऐकताच पीडित मुलीच्या भावाने तिकडे धाव घेतली. त्याने रडतच सांगितले की, तिची प्रकृती अतिशय गंभीर होती. तिला ताबडतोब हॅलट हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी बहिणीला आयसीयूमध्ये दाखल केले आहे.
- शुद्धीवर येताच बहिणीने गावातीलच संतराम, निर्मल, अतुल, पत्तर यांची नावे घेतली. म्हणाली की, या नराधमांनीच मला बळजबरी पकडून लंका मैदानावर नेले होते.
- विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार- 'मंदिरातून परतत असताना बराच अंधार झाला होता. माझ्या तोंडावर हात दाबून त्या चौघांनी मला उचलून नेले. मग गँगरेप करून विषारी पदार्थ खाऊ घातला. मग बेशुद्धावस्थेत मला फेकून पळून गेले.'

 

काय म्हणतात पोलिस?
सचेंडी पोलिसांतील राघवेन्द्र सिंह यांच्या मते, तरुणीने शुद्धीवर येताच घटनेची पूर्ण माहिती दिली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे, त्यांना लवकरच अटक केली जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या खळबळजनक प्रकरणाचे Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...