• Home
  • college students finding sugar daddies, shares experiences in shocking report

बापाच्या वयाच्या पुरुषांसोबत / बापाच्या वयाच्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध बनवत आहेत या College च्या विद्यार्थिनी; या देशात वाढतेय Sugar Daddies चे चलन

दिव्य मराठी वेब टीम

Nov 11,2018 12:01:00 AM IST

नॅरोबी - जगभरात गेल्या अनेक वर्षांपासून शुगर डॅडी टर्म चर्चेत आहे. अनेक देशांमध्ये धनाढ्य लोकांमध्ये शुगर डॅडीचे चलन वाढले आहे. सध्या आफ्रिका खंडातील केन्या यात सर्वात प्रसिद्ध होत आहे. आर्थिक परिस्थिति मजबूत करण्यासाठी आणि ऐश म्हणून महाविद्यालयीन तरुणी आपल्या वडिलांच्या वयाच्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध बनवत आहेत. यासाठी त्या आपल्या प्रोफाईल डार्क इंटरनेटवर अपलोड करत आहेत. अशा तरुणींसोबत वेळ घालवण्यासाठी वयोवृद्ध पुरुष त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तयार होतात. केन्यात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणी शिरो हिने या क्षेत्रात आपला अनुभव व्यक्त केला आहे.


कॉलेजची विद्यार्थिनी आहे शिरो...
ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शिरो 18-19 वर्षांची असताना तिची भेट एका 40 वर्षांच्या विवाहित पुरुषासोबत झाली होती. आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिरोने त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिरोला पहिल्या भेटीत तिच्या शुगर डॅडीने अनेक गिफ्ट्स दिले. यानंतर भेटींचा हे चलन असेच सुरू झाले. आपल्यापेक्षा दुप्पट आणि तीन पट वय असलेल्या पुरुषांसोबत सेक्स करून तिने मोठ्या शहरात स्वतःचे घर खरेदी केले होते. यानंतर 4 वर्षांत तिने एक मोठे प्लॉट विकत घेतले. शिरोने सांगितल्याप्रमाणे, सगळेच पुरुष फक्त शारीरिक संबंध बनवण्यासाठी भेटत नाहीत. काहींना या तरुणींसोबत फक्त काही वेळ घालवायचा आणि भावना व्यक्त करायच्या असतात. केन्यात शिरो अशी एकटी तरुणी नाही. तिच्यासारख्या असंख्य महाविद्यालयीन तरुणींनी शुगर डॅडीचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या ऑनलाईन जाहिराती देखील सुरू केल्या.


असा बदलत आहे समाज
- केन्यात राहणारी 20 वर्षीय जेनने आपल्यासाठी एक नव्हे, तर दोन-दोन शुगर डॅडी निवडले आहेत. ग्रॅजुएशनचे शिक्षण घेणारी जेनचे टॉम आणि जेफ या दोघांशीही संबंध आहेत. जेन सांगते, की ते दोघे नेहमीच तिची मदत करतात. परंतु, नेहमीच तिला याची भरपाई सेक्सच्या बदल्यात करावी लागते. अनेकवेळा हेच दोघे तिला फक्त बोलणे आणि वेळ घालवण्यासाठीही पैसे देतात.
- जेनच्या मते, आर्थिक संरक्षणासाठी तिने शुगर डॅडी बनवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून छोट्या बहिणीचे शिक्षण आणि घराचा खर्च चालवता येईल. केन्याच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या तरुणी सुद्धा आता आपल्या शुगर डॅडीचा शोध घेत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये राहत असल्या तरीही त्या शुगर डॅडीसाठी जाहिराती देताना उच्चभ्रू दिसण्याचा प्रयत्न करतात.


खर्च भागवण्यासाठी विद्यार्थिनी निवडतात शुगर डॅडी
यूनिव्हर्सिटी ऑफ नॅरोबीत विद्यार्थिनी असलेली सिलास सांगते, कि शुक्रवारी रात्री हॉस्टेलच्या बाहेर पाहिल्यास फक्त मंत्री, अधिकारी, उद्योजक आणि धनाढ्यांच्या गाड्या थांबलेल्या दिसतील. हे लोक या विद्यार्थिनींना बोलावण्यासाठी आपल्या कार आणि ड्रायव्हर पाठवतात. यामध्ये 18 ते 24 वर्षे वयोगटातील मुलींचा समावेश आहे. विद्यापीठातील 20 टक्के तरुणी आता शुगर डॅडीसाठी काम करतात. यातूनच त्या आपल्या कॉलेजची फी आणि घर खर्च चालवत आहेत.


शुगर डॅडीचे चलन घातक
केन्यात वाढत्या शुगर डॅडीच्या चलनावर सवाल उपस्थित केले जात आहेत. लोक याला वेश्यावृत्ती म्हणून विरोध करत आहेत. अशा कृत्यांनी महिलांचे सशक्तीकरण तर दूरच त्यांचे सर्रास शोषण केले जात आहे. महिलांच्या शरीराचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर होत आहे. अशा चलनात वाढणाऱ्या महिला पारतंत्र्यात आणि गुलामगिरीत जगत आहेत.

व्हेरा सिदिकाने प्लेबॉय संस्थापक ह्यू हेफनर आपले शुगर डॅडी होते असा दावा केला होता.व्हेरा सिदीका

व्हेरा सिदिकाने प्लेबॉय संस्थापक ह्यू हेफनर आपले शुगर डॅडी होते असा दावा केला होता.

व्हेरा सिदीका
X
COMMENT