आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्ममग्न विरोधक प्रभावी ठरणे अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज विरोधकांचे हाल गर्भगळीत, शून्यात हरवलेल्या आत्ममग्न, एकाकी पडलेल्या व्यक्तीसारखे झाले आहेत. याचा ज्वलंत दाखला राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत मिळाले. काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांना समर्थक मतांच्या अंदाजानुसार, जेवढी मते मिळायला हवी होती, तेवढीही मिळाली नाहीत, तर एनडीएच्या हरिवंश यांना भाजपच्या मित्रपक्षांच्या संख्येच्या तुलनेत जास्त मते मिळाली. 


सत्तापक्षासमोर विरोधकच नसतील तर ते एकतंत्री सरकार होईल. भारतात सत्ताधारी पक्षांना कधीही मनमर्जीप्रमाणे वागू दिले जात नाही, त्यामुळेच भारतीय लोकशाहीचा पाया जगाच्या तुलनेत मजबूत आहे. पं. नेहरूंच्या काळात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी विरोधी पक्षांचे सर्वसंमत नेता होते. पण काँग्रेसमध्येही नेतृत्वावर तसेच सरकारबाबत समीक्षण आणि टीकेचे सूर उठत होते. चीनने अक्साई चीनवर ताबा मिळवण्याच्या मुद्द्यावर पं. नेहरू यांनी लोकसभेत म्हटले होते की, तेथे तर गवताचे एक पातेही दिसत नाही. यावर काँग्रेसचेच महावीर त्यागी उठून उभे राहिले व म्हटले, 'पंडितजी, तुमच्या डोक्यावर तर एकही केस उगवत नाही. मग काय कराल?' राममनोहर लोहिया, अटलबिहारी वाजपेयी, ज्योतिर्मय बसू, पीलू मोदी, हीरेन मुखर्जी, इंद्रजित गुप्त यांसारखे नेते उत्तम वक्तृत्व, शालीनता, संयम व क्षमेवर आधारित वाक्पटुत्व आणि प्रहारक तर्कक्षमतेसाठी प्रसिद्ध होते. 
एकदा मारुती कार, संजय गांधी आणि केंद्र सरकारची त्यात गुंतवणूक या मुद्द्यावरून प्रश्नोत्तरे सुरू होती. लोकसभेत खूप गोंधळ माजला. अटलबिहारी वाजपेयी बोलण्यासाठी उभे राहिले. आपल्या तिखट व भेदक भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले, 'मुलगा कार बनवतो, आई बेकार बनवते.' राग आणि तणावाच्या वातावरणात असलेले सदन त्या वेळी खळखळून हसले. 


आज विरोधकांचे हाल लुटल्या, मारल्या गेलेल्या, शून्यात हरवलेल्या आत्ममग्न, एकाकी पडलेल्या व्यक्तीसारखे झाले आहेत. याचा ज्वलंत दाखला राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत मिळाले. काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांना समर्थक मतांच्या अंदाजानुसार, जेवढी मते मिळायला हवी होती, तेवढीही मिळाली नाहीत, तर एनडीएच्या हरिवंश यांना भाजपच्या मित्रपक्षांच्या संख्येच्या तुलनेत जास्त मते मिळाली. एवढेच नाही, तर भाजपवर नाराज पीडीपीनेही काँग्रेसपासून दूरच राहणे पसंत केले. आपनेही साथ दिली नाही, नवीन पटनायक व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव एनडीएमध्ये नाहीत. पण त्यांनीदेखील काँग्रेससोबत न जाता मोदींच्या पक्षाच्या उमेदवाराला मत दिले. हा अहंकाराचा पराभव व नम्रतेचा विजय होता. नरेंद्र मोदी कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. नवीन पटनायक एनडीएचे मित्रपक्ष नाहीत, पण हरिवंश यांच्या विजयासाठी मोदींनी त्यांना फोन करून विनंती केली. राहुल गांधी चहुबाजूंनी घेरलेले असतानाही आपण काँग्रेसचे 'शक्तिशाली' नेते असल्याच्या अहंकारात राहिले. याचे परिणाम उघड दिसले. 


सध्या राहुल गांधी यांची एक व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, मोदी बीएचईएल किंवा बीईएलकडून मोबाइल का नाही घेत? आता हा माहितीचा अभाव आहे की आणखी काही, पण या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांचा काय संबंध? त्यांना काही वेगळेच म्हणायचे असेल अन् त्यांनी दुसरेच उदाहरण दिले. 


राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत काँग्रेस स्वत:च्याच खासदारांचे पूर्ण संख्याबळ मिळवू शकली नाही, यापेक्षा मोठे अपयश आणखी काय असू शकते? काँग्रेसचे तीन खासदार, तृणमूलचे दोन खासदार गायबच होते, तर पीडीपी, द्रमुक, समाजवादी, आप आणि नागा पीपल्स फ्रंटचे खासदारही गैरहजर होते. हे विरोधकांची एकता आणि गांभीर्याचे मोठे उदाहरण आहे. 


तिकडे बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या धडाकेबाज सभांनी ममता बॅनर्जी सरकारला धडकी भरली आहे. मुस्लिम मतदारांसाठी त्यांनी मुस्लिम टोपी घालणे, मोहरमसाठी दुर्गा पूजेच्या नियोजित दिवशीच विसर्जन यात्रेवर बंदी घातली. सरस्वतीची पूजाही रोखली. हिंदूंवर प्रहार करून आपण मुस्लिमांना खुश करू शकतो, ही धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या नेत्यांची धर्माविषयीची विचारसरणी असते. हे विचार मुस्लिमांना मुळात हिंदूविरोधी, हिंदूंचे शत्रू मानण्यावर आधारित आहेत. त्यामुळे हे विचार देशविभाजक तसेच मुस्लिमांसाठीही अपमानकारक आहेत. कारण ही विचारसरणी मुस्लिमांना मूर्ख तसेच खेळणे असल्याचे मानतात. ममता दीदी ज्याप्रमाणात मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहेत, तेवढेच राष्ट्रीय हितासाठी प्रेरित देशभक्त बंगाली समाज भाजपच्या जवळ येत आहे. 


आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे उतरणे हेदेखील देशभक्ती व तिरंग्याशी नाते सांगणारा भारतीय समाज एकजूट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. भारतात भारतीय बनून राहायचे की विदेशी बांगलादेशी? बांगलादेशींचे समर्थन करणारा पक्ष राष्ट्रीय स्तरावरील सरकार चालवणे तसेच भारताच्या हितांची रक्षा करण्यास पात्र ठरू शकतो का? 


विरोधकांमधील काही नेत्यांनी दलितांवरील प्रहाराचे मुद्दे मांडले. पण त्यांचे दलित प्रेम केवळ मोदींवर प्रहार करण्यासाठीचे साधन तर नाही ना? कर्नाटक, केरळ, बंगालमध्ये दलित तरुणांच्या पाशवी हत्यांवर मौन आणि उत्तर प्रदेशातील अशाच घटनांवरून राजकारण, हा कुठला प्रामाणिकपणा? काँग्रेसकडे अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीत. काँग्रेसने नेहमीच डॉ. आंबेडकरांचा विरोध का केला? निवडणुकांमध्ये त्यांना हरवण्याचे षडयंत्र का रचले गेले, त्यांना भारत रत्न का नाही दिला? त्यांना भारतरत्न देण्यासाठी व्ही. पी. सिंह सरकारचे मित्रपक्ष म्हणून भाजपने पुढाकार घेतला. नरेंद्र मोदीदेखील पूर्वीपासून दलितांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांनीच मुंबईतील प्रतिष्ठित इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. लंडनपासून महूपर्यंत डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील पाच महत्त्वाची ठिकाणे पंचतीर्थ म्हणून विकसित केले. तसेच दलित अत्याचारांबाबत कायद्याची नव्याने व्याख्या करायला लावणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उलटवून तसा कायदा याच संसदेच्या सत्रात पारित केला. देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात अनुसूचित जाती-जमातींसाठी डॉ. आंबेडकर यांची तत्त्वे जगणारे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे नाव घेता येईल. २०१४पूर्वी निवडणुकींवरून जगभरात जी उत्सुकता होती, तसेच वातावरण आज आहे. जागतिक अर्थव्यवस्था, प्रादेशिक सैन्य शक्ती संतुलन, भूराजकीय समीकरणे ही सर्व उद्दिष्टे नरेंद्र मोदी पूर्ण बहुमतासह सत्तेत आल्यानंंतरच साध्य होतील. सुदैवाने भाजपच्या नेतृत्वाच्या मांदियाळीत शिवराजसिंह चौहान, रमण सिंह, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, मनोहर लाल, रघुवर दास यांसारख्या पक्क्या विचासरणीचे, ज्यांच्याबद्दल लोकांना प्रचंड आत्मीयता आहे, असे नेते आहेत. बिहारमध्ये नितीश हे राष्ट्रीय स्तरावरील प्रामाणिक नेते आहेत. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल, अरुणाचलमध्ये पेमा खांडू आणि त्रिपुरात 'विप्लवी' विप्लव दास यांनी आपले कार्य आणि नम्रतेने राष्ट्रीय स्तरावर वेगळी उंची गाठली आहे. या भारत भक्त सेनेसमोर कुणीही उभे ठाकणे शक्य होईल का? 


मुस्लिम मतदारांसाठी त्यांनी मुस्लिम टोपी घालणे, मोहरमसाठी दुर्गा पूजेच्या नियोजित दिवशीच विसर्जन यात्रेवर बंदी घातली. हिंदूंवर प्रहार करून आपण मुस्लिमांना खुश करू शकतो, ही धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या नेत्यांची धर्माविषयीची विचारसरणी असते. 

- तरुण विजय, भाजपाचे माजी खासदार 

बातम्या आणखी आहेत...