आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक, राजकीय प्रगती हा माेठा पल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९५० मध्ये भारताचा जीडीपी ९३.७ अब्ज रुपये हाेता, ताे २०१७ मध्ये १२२ लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला हाेता. पण ही प्रगती सर्व क्षेत्रांपर्यंत समसमान पद्धतीने पाेहाेचली का? अखेर स्वतंत्र भारतात १९४७ पासून अातापर्यंतच्या प्रवासात आपण कुठवर पाेहाेचलाे अाहाेत? 


१९८० च्या दशकात अाम्ही चीनच्यादेखील खूप पुढे हाेताे. अामची धाेरणे बराेबर हाेती, परंतु अाज चीनची धाेरणे अापल्या तुलनेत पाचपट अधिक पुढे अाहेत. निश्चितच यावर विचार करायला हवा की, हे का झाले? अाणि अाता अाम्हाला काय करायला हवे? 


१९४७ पासून भारतीयांनी तीन एेतिहासिक बदल अनुभवले. त्यात सामाजिक, राजकीय अाणि अार्थिक मुद्दे अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. हेच उद्दिष्ट स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी ठरवण्यात अाले हाेते. त्या वेळच्या तुलनेत अाज कितीतरी क्षेत्रांत अाम्ही उल्लेखनीय प्रगती केली अाहे, जी महत्त्वपूर्ण ठरते. जगाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, तीन माेठी उद्दिष्टे निश्चित करण्यात अाली अाणि ती पूर्ण करण्याचा विडा उचलण्यात अाला. जगातील अन्य बहुतेक राष्ट्रांनी एकानंतर एक अशी उद्दिष्टे पूर्ण करण्याचे ठरवले अाणि अद्याप त्यांना पूर्ण करता अाली नाहीत. चीनचे उदाहरण घ्या, तिथे अजूनपर्यंत राजकीय परिवर्तन हाेऊ शकलेले नाही. अापल्या देशातील राजकीय परिवर्तनाविषयी असे सांगितले जात हाेते की, भारतानेे जी लाेकशाही व्यवस्था अंगीकारली अाहे ती यशस्वी ठरणार नाही, असफल ठरेल. कारण या देशात न साक्षरतेचे प्रमाण अधिक अाहे, शिवाय नागरिकांचे उत्पन्न पुरेेसे नाही, काेणता विकास झालेला नाही. अशाही परिस्थितीत अाम्ही १९४७ पासून अातापर्यंत उल्लेखनीय बदल घडवून दाखवला. अाज सारे जग भारतीय लाेकशाहीकडे ‘माॅडेल लाेकशाही’ म्हणून पाहते.  अाज भारतीय लाेकशाही केवळ चांगल्या स्थितीत अाहे असेच नव्हे तर अतिशय सामर्थ्यवान लाेकशाहीच्या रूपात जगभर अाेळखली जाते. अाम्ही साऱ्या जगाला दाखवून दिले अाहे की, एक विकसनशील देशदेखील लाेकशाही व्यवस्थेचा केवळ अंगीकार करून थांबत नाही तर तिच्या मूल्यांनादेखील सुदृढ बनवू शकतो. जर तुम्ही लॅटिन अमेरिका, अाशियातील काही देश अाणि अाफ्रिकेमध्ये पाहाल तर जेथे-जेथे लाेकशाही व्यवस्थेचा पुरस्कार करण्यात अाला हाेता तेथे बहुश: ती अपयशी ठरलेली दिसते. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने अाम्ही अहिंसात्मक मार्गाने माेठा बदल घडवला अाहे. सर्वात माेठ्या राज्यात दलित समाजातील महिला चार वेळा मुख्यमंत्री हाेऊ शकली, हे अापण पाहिले अाहे. अामच्या लाेकसभेच्या अध्यक्षपदावर दलित महिला विराजमान हाेऊ शकली. अामचे राष्ट्रपती दलित हाेते. बहुतेक राज्यांमध्ये दलित मुख्यमंत्रीदेखील झाले. काेणत्याही प्रकारच्या क्रांतीशिवाय, अहिंसात्मक मार्गाने संपूर्ण सामाजिक व्यवस्था पालटून टाकणे, ही काही लहानसहान बाब नव्हे. दलितांच्या शाेषणाची काेणतीही बाब अापल्या लाेकशाहीचा भाग झाली नाही, किंबहुना तशी व्यवस्थाच या प्रणालीत नाही. १९४७ मध्ये अापल्या देशात सरंजामशाही हाेती. परंतु तेव्हापासून अातापर्यंत अाम्ही जे काही साध्य केले अाहे, ते काेणत्याही क्रांतीशिवाय मिळवलेले अाहे. ही खूप माेठी उपलब्धी अाहे, तिचा अापणा सर्वांनाच अभिमान असायला हवा. 


अार्थिक अाघाडीवर अापल्या देशाने माेठा बदल घडवला अाहे. १९४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा अामच्या जीडीपीनुसार दरडाेई उत्पन्न १५० डाॅलर (तत्कालीन स्थितीत सुमारे ९०००) हाेते, ते अाज २००० डाॅलर (१.३० लाखाहून अधिक) अाहे. तेव्हा अाम्ही बऱ्याच क्षेत्रांत मजबूर हाेताे. विशेषत: खाद्यान्नाची ददात हाेती. १९६० च्या दशकात बिहारमध्ये दुष्काळ पडला हाेता, तेव्हा खूप माेठ्या प्रमाणावर अन्नधान्याची अायात करावी लागली हाेती. राज्यांना पुरेशा प्रमाणात खाद्यान्न उपलब्ध करून देणे शक्य हाेत नव्हते. त्या वेळी अापले दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नागरिकांना एक दिवस उपवास करण्याचे अावाहन केले हाेते. त्या वेळची स्थिती पाहा अाणि अाजचे खाद्यान्नासंदर्भातील वर्तमान पाहा, सारी गाेदामे अन्नधान्याने भरलेली अाहेत. अाज मध्य प्रदेशसह अन्य काही राज्ये खाद्यान्न उत्पादनाच्या बाबतीत बरीच पुढे गेली अाहेत. म्हणूनच अाज काेणीही म्हणू शकत नाही की, खाद्यान्न सुरक्षा पुरवण्यात अापली कुठे चूक झाली अाहे किंवा त्यात काही त्रुटी राहिलेल्या अाहेत. अाजची स्थिती खूपच वेगळी अाहे.  १९४७ नंतर अातापर्यंत येथे हरितक्रांती हाेत राहिली, धवलक्रांती झाली. अाज अापल्या देशात पुरेशा प्रमाणात दुधाचे उत्पादन हाेत असते. दारिद्र्य रेषेची पातळी विचारात घेता देशाने १९४० चे दशकदेखील अनुभवले. १९४२ मध्ये माेठ्या मुश्किलीने स्थितीचा मुकाबला केला हाेता. अाज अापला देश गरिबी निर्मूलनाच्या दिशेने वेगाने कूच करीत अाहे. याचमुळे अाज गरीब-श्रीमंत यामध्ये माेठे अंतर राहिलेले नाही. अाम्ही वित्त अायाेगाच्या शिफारशी लागू केल्या, अनेक कार्यक्रम राबवले. त्याचा अाम्हाला फायदा झाला. सर्वच क्षेत्रांमधील विकासावर अाम्ही लक्ष केंद्रित केले अाणि त्यात यश संपादित केले. यात नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचाही भाग अंतर्भूत अाहेच. 


राजकीय अाणि सामाजिक बदलाच्या तुलनेत अार्थिक परिवर्तन अजून तरी अपेक्षेप्रमाणे तडीस गेलेले नाही. कारण अार्थिक परिवर्तनाचा वारू याेग्य अाणि नियाेजनबद्धरीत्या हाकला गेला नाही. १९८० मध्ये चीन अाणि भारताचे सरासरी उत्पन्न बराेबरीत हाेते. काही क्षेत्रांमध्ये तर भारत चीनच्यादेखील पुढे हाेता. परंतु अाज चीनचे दरडाेई उत्पन्न अामच्यापेक्षाही पाचपट अधिक अाहे. अर्थातच यावर चिंतन व्हायला हवे, की असे का घडले अाणि अाता अाम्हाला काय करण्याची गरज अाहे. सामाजिक अाणि राजकीय बदलांचे उद्दिष्ट पूर्ण हाेऊ शकले कारण महात्मा गांधींसारख्या नेत्यांनी त्यास जनअांदाेलन बनवले हाेते. डाॅ. अांबेडकर, नेहरूंसारख्या नेत्यांनी ते पुढे नेटाने चालवले. अार्थिक विकासाला अाम्ही जनअांदाेलनाचे स्वरूप देऊ शकलाे नाही. अाज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘नवा भारत’चे अावाहन केले अाहे. २०२२ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचे अाहे. अापल्यापैकी प्रत्येकालाच नव्या भारताची कल्पना करायला हवी. त्यासाठी अाज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अापण हा संकल्प करू शकताे की, अाम्ही जे करीत अाहाेत त्यामुळे देशाचा किती विकास हाेत अाहे हे पाहू. त्यामुळे हे लक्षात येईल की, अाम्ही देशाच्या विकासासाठी काम करीत अाहाेत की नाही. याशिवाय अाम्हाला या बाबींवरदेखील लक्ष द्यायला हवे की अाम्ही जे काही करीत अाहाेत त्यामुळे देशाचा विकास अाणि तरुण-तरुणींसाठी राेजगार संधीची निर्मिती व्हावी, तरच अामची सारी धाेरणे उपयुक्त ठरतील. सर्व राज्ये एकजुटीने काम करतील अाणि यशस्वी हाेतील. अापल्यात सामर्थ्य अाहे, अापण सक्षम अाहाेत. अापल्यात अशी काेणतीही उणीव नाही की ज्यामुळे हे उद्दिष्ट अापण पूर्ण करू शकणार नाही. 


अर्थातच, अापल्या देशाचा विकास झालाच नाही असे म्हणणे अतिशय चुकीचे ठरेल. लाेखंड, सिमेंट, वीजनिर्मिती, सेवा क्षेत्र, कारखाने, उद्याेग, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात अाम्ही उल्लेखनीय प्रगती केली अाहे. काही देशांच्या तुलनेत अापण अग्रेसर निश्चितच अाहाेत. मात्र अापणास अाणखी पुढचा टप्पा गाठायचा अाहे. २०४७ मध्ये जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा शतकपूर्ती साेहळा साजरा करू ताेपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करून अापण दुसरी माेठी अार्थिक महासत्ता बनू. जेव्हा हे घडेल तेव्हा साऱ्या जगासाठी अापण अादर्शवत ठरू. कारण भारताने सर्व घटकांना साेबत घेऊन सामाजिक, राजकीय अाणि अार्थिक विकास घडवल्याचे सिद्ध झालेले असेल.

- राजीव कुमार, उपाध्यक्ष, नीती अायाेग 

बातम्या आणखी आहेत...