आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावावरून गमती-जमती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या मुलीचा जन्म 11 ऑगस्टचा; मी त्या वेळी माहेरी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील तिसगावला होते. ‘पहिली बेटी-धनाची पेटी’ असे म्हणत घरातच तिचे जोरदार स्वागत झाले. आता तिचे नाव काय ठेवायचे यावरून घरात जोरदार चर्चा सुरू झाली. पाथर्डीची मोहटादेवी आईची कुलदैवत आहे. म्हणून तिचे नाव ‘रेणुका’ असे ठेवायचे. रेश्माची रेणुका! तसेच रेणुका नावामध्येही शक्तीचा भास होतो. मलाच काय, घरातील सर्वांना हे नाव आवडले. सगळे जण तिला रेणुका म्हणू लागले; पण या नावात आणि माझ्या नावामुळे ब-याच गमती-जमती घडत होत्या. तिसगावचा आठवडी बाजार दर गुरुवारी भरतो. आई बाजारात गेली तेव्हा तीन महिन्यांच्या रेणुकाला घेऊन मी व माझी आजी दवाखान्यात गेलो. तिथे डोस दिल्यानंतर रेणुका रडायला लागली.

आजी व मी तिला शांत करत होतो; तुमची रेश्मा खूपच रडत होती. ही घटना बाजारात असलेल्या आईला कोणी तरी सांगितली. माझी आई घाबरून बाजार अर्धवट सोडून घरी पळतच आली. आम्हाला हा प्रसंग सांगितला आणि सगळेच हसू लागलो. पुढे काही वर्षांनंतरही असाच गमतीशीर प्रसंग घडला. एकदा रेणुकाने राम मंदिरात अतिशय सुंदर ‘ठुमकत चलत रामचंद्र’ ही अतिशय अवघड गीत गायले. सगळे जण स्तब्धच झाले. मंदिरातल्या काकांनी वडिलांना म्हटले, तुमची रेश्मा खूपच चांगले गायन करते. अंगावर काटाच आला. ते ऐकून माझ्या वडिलांच्या अंगावर काटा आला. घरातसुद्धा कधीही न गुणगुणणारी माझी मुलगी मंदिरात गाणे केव्हापासून म्हणू लागली? नंतर त्यांना कळले, त्यांच्या गाणे नातीने गायले होते. अशा गमती-जमती ब-याचदा घडल्या. त्यानंतर शाळेत तिचे नाव कागदोपत्री प्रज्ञा असे ठेवले. म्हणून मला तरी असे वाटते की, नावातच सर्व काही असते. आपल्याकडे नावाचे महात्म्य फार आहे.