आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडच्यावतीने श्रीपाद जोशींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे करण्यात आले दहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - प्रख्यात साहित्यिक नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण दिले होते, दरम्यान ते निमंत्रण रद्द केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्यावतीने बसस्थानक चौकात बुधवार, दि. ९ जानेवारीला महामंडळाचे मावळते अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. 

 

यवतमाळ होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद््घाटक म्हणून प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐन वेळेवर रद्द करण्यात आले. हा प्रकार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मावळते अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. 
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक बसस्थानक चौकात श्रीपाद जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला निषेध नोंदवला. या दरम्यान श्रीपाद जोशी यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे, गजानन चेके, सचिन मनवर, सतीश राऊत, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.मागील काही दिवसापासून यवतमाळ येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनामध्ये नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या मुद्दयावर राज्यभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...