आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Comeback : Karisma Kapoor's Comeback, Will Play Mother's Role In Web Series 'Mantlehud'

कमबॅक : सात वर्षांनंतर करिश्मा कपूरचे पुनरागमन, वेब सिरीज 'मेंटलहूड'मध्ये साकारणार आईची भूमिका 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 2012 मध्ये 'डेंजरस इश्क' मध्ये झळकलेली करिश्मा कपूर आता सात वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन करणार आहे. यासाठी तिने डिजिटल प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. करिश्मा टीव्ही क्वीन एकता कपूरच्या निर्मिती हाऊसमध्ये बनलेली वेब सिरीज 'मेंटलहूड'मधून पुनरागमन करणार आहे. या मुलाखतीत करिश्माने आपला कमबॅक शो, पात्रा आणि बहीण करिनाविषयी चर्चा केली. 

 

सात वर्षांत आवडती स्क्रिप्ट मिळाली नाही... 
खर तर गेल्या सात वर्षांत माझ्याकडे अनेक ऑफर्स आल्या. मात्र एकही स्क्रिप्ट मनासारखी नव्हती. मला 'आऊट ऑफ चॉइस' काम करणे आवडत नाही. मात्र जेव्हा एकताने 'मेंटलहूड'ची कथा मला ऐकवली तेव्हा मला ती कथा आवडली. याचीच वाट पाहत होते, असे मला वाटले. या निर्णयामुळे मी खूपच खुश आहे. शिवाय धाकटी बहीण करिना कपूर टीव्हीवर निर्णायकाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे मी खुश आहे. तिला त्या खुर्चीवर पाहण्यासाठी मी उत्सुक झाले आहे. 

 

आई आणि मातृत्वाच्या उल्लेखावर भावुक होते... 
या सिरीजमध्ये एका आईची भूमिका करत आहे. कठीण परिस्थितीमध्ये आई काय करते,यावर ही सिरीज आधारित आहे. यात भावुकता आणि विनोदाचा मिश्रणदेखील आहे. खरं त, कुठेही आई आणि मातृत्वाचा उल्लेख निघाला तरी मी भावुक होतो. स्क्रीनवर मी एक रुढीवादी पण आधुनिक आई आहे आणि खऱ्या जीवनातदेखील तशीच आहे. वास्तविक जीवनातदेखील मला दोन वेगळ्या विचारांना एकत्र आणावे लागते. 
 

बातम्या आणखी आहेत...