आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रीनवर महिलेची भूमिका साकारण्याची इच्छा नाही, 52 वर्षांच्या अॅक्टरने व्यक्त केले दुःख, म्हणाला - मी थकलो आहे आणि यामुळे नाकारल्या अनेक ऑफर्स 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. अभिनेत्यानंतर कॉमेडियन बनलेला अली असगरने द कपिल शर्मा शोमध्ये नानीची भूमिका साकारुन खुप प्रसिध्दी मिळवली. पण अशा प्रकारच्या भूमिका साकारुन अली बोर झाला आहे. 52 वर्षांच्या अलीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी महिलांची भूमिका साकारुन बोर झालो आहे आणि थकलो आहे. मला स्वतःची काहीच ओळख उरलेली नाही. मला अशाच प्रकारचे रोल ऑफर होत आहे, यामुळे ब-याच भूमिका नाकारल्या आहेत.'
- 8 फेब्रुवारीला रिलीज होत असलेल्या 'अमावस' चित्रपटात अली दिसणार आहे. याविषयी तो म्हणाला की, 'जेव्हा जेव्हा प्रोडक्शन हाउसला किंवा चॅनलला अशा भूमिकांची गरज असायची, मला अप्रोच केले जात होते. त्यावेळी मी त्यांना विचारायचो की, अखेर यासाठी माझीच निवड का? तेव्हा ते म्हणायचे की, लोक तुला या भूमिकेत पाहणे पसंत करतात.'

 

7 महिने रिकामा बसला 
अलीने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'एक सारख्या ऑफर्स मिळाल्यामुळे मी रोल स्विकारणे बंद केले. यामुळे मी 7 महिने घरात बसून राहिलो. यादरम्यान मी काही स्टेज शो आणि फंक्शन्समध्ये परफॉर्म केला होता.'
- तो म्हणाला - 'आता मी महिलेच्या भूमिकेपेक्षा वेगळी काही तरी भूमिका साकारायची आहे.'


2 मुलांचा वडील आहे अली 
ख-या आयुष्यात अली विवाहीत आहे. 2005 मध्ये त्याचे लग्न झाले. अलीच्या पत्नीचे नाव सिद्दीका असगर आहे. अलीला दोन मुलं आहेत. त्याने आपल्या मुलाचे नाव नुयान आणि मुलीचे नाव अदा ठेवले आहे. शूटिंगनंतर अली आपला जास्तीत जास्त वेळ कुटूंबासोबत घालवतो. तो आपल्या फ्रेंड्ससाठीही वेळ काढतो. 

 

1980 मध्ये सुरु केले होते करिअर 
अलीने 1987 मध्ये दूरदर्शनच्या 'एक दो तीन चार'मधून अॅक्टिंग करिअर सुरु केले होते. त्यावेळी तो अवघ्या 21 वर्षांचा होता. त्याला खरी ओळख 2000-08 च्या काळात एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेतून मिळाली. या शोमध्ये त्याने कमल अग्रवाची भूमिका साकारली होती. 

 

या शोजमध्ये केले काम 
अलीने 'कुटुंब', 'हम पांच' सीजन-2, 'घर की बात है', 'एफआईआर', 'जीनी और जूजू', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 
- त्याने 'तीस मार खां' (2010), 'हॉर्न ओके प्लीज' (2009),, 'राज' (2002) , 'जोश'(2000), 'जीना सिर्फ मेरे लिए'(2002) , 'सन्डे' (2008), 'दिल-विल प्यार-व्यार'(2002), और 'परंपरा'(1992)  चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोलची भूमिकाही साकारली आहे. 
 


 

बातम्या आणखी आहेत...