आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : कॉमेडियन भारती सिंह नेहमीच लोकांना हसवत असते. अशातच भारती सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीचा शो 'खतरा-खतरा' मधील आहे. अशातच सिंगर नीति मोहन आपल्या बहिणी शक्ति मोहन आणि मुक्ति मोहन यांच्यासोबत शोमध्ये पोहोचली होती. यादरम्यान शोमध्ये खूप मस्ती झाली.
शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये नीति आणि भारती फ्लोअरवर झोपलेल्या दिसत आहेत. त्याचवेळी भारती व्हिडिओ बनावट असलेल्या व्यक्तीला असे काही बोलते की, ज्यामुळे तिथे असलेले सर्वच जण जोरजोरात हसू लागतात. व्हिडीओ बनावट असलेल्या व्यक्तीकडे पाहून भरती म्हणते, 'तुमचे पोट दिसत आहे भैय्या खालून.' भारतीचे हे बोलणे ऐकून सर्वचजण खूप हसतात. वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नीति मोहनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर फॅन्स खूप मजेदार कमेंट करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.