आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांपूर्वीच भारती सिंगने साजरा केला वाढदिवस, पती हर्षने शोच्या सेटवर दिले सरप्राइज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टीव्ही डेस्क - प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग 3 जुलैला आपला 33 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण एका आठवड्यापासून याचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. भारती 'खतरा खतरा खतरा' या आपल्या शो ची शुटिंग करत असताना तिचा पती हर्ष लिम्बचियाने तिला सरप्राइज दिले. हर्षने सेटवर एक मोठा केक मागवला आणि तेथील सर्व कलाकारांसोबत भारतीचा वाढदिवस साजरा केला. हे सेलिब्रेशन का होत आहे हे भारतीला समजलेच नाही. पण हर्षने सांगितल्यानंतर ती हैराण तर झालीच पण तिने हा सोहळ्याचा आनंद देखील घेतला. 

 

हर्ष म्हणाला - मला भारतीला सरप्राइज द्यायला आवडते
दैनिक भास्करशी बोलताना हर्षने सांगितले की, 'खरं तर मला भारतीला नेहमीच सरप्राइज द्यायला आवडते. ती स्पेशल आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी शक्य तितक सर्व काही करतो. गेल्या वाढदिवसादिवशी मी तिच्या नावाचे गोंदण माझ्या छातीवर गोंदले होते. यावर्षी आम्ही तिच्या वाढदिवसादिवशीच शुटिंग करत आहोत. पण याचा अर्थ असा नाही मी तिचा वाढदिवस साजरा करणार नाही. माझ्याकडून यावेळी देखील काही स्पेशल असणार आहे.'

 

2 जुलै रोजी रात्री समोर आली हर्षची योजना
हर्ष पुढे बोलताना म्हणाला की, 'मी तिच्या वाढदिवसासाठी विशेष प्लानिंग केली आहे. 2 जुलै रोजी ती माहीत होईल. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या तरी आम्ही आमच्या व्यस्त दिनचर्येतून कोठे बाहेर फिरायला जाऊ शकत नाही. पण आम्ही लवकरच छोट्याशा ट्रिप प्लॅन करू.'


प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये या सेलिब्रिटीजची होती उपस्थिती
या सेलिब्रेशनमध्ये कोरियोग्राफर पुनीत पाठक, राघव जुयाल आणि धर्मेश येलंडे उपस्थित होते. केक कटिंगनंतर सर्वांनी 'छोटे तेरा हॅप्पी बर्थडे' गाण्यावर डान्स केला. 

बातम्या आणखी आहेत...