आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Johnny Lever Struggle Story: आर्थिक अडचणींमुळे फक्त 7वीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले जॉन लीवर, पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकायचे पेन, टॅलेंट पाहून एका बॉलिवूड अॅक्टरने दिली चित्रपटात काम करण्याची संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रसिध्द कॉमेडियन जॉनी लीवर हे पुढच्या महिन्यात रिलीज होणा-या 'टोटल धमाल' चित्रपटात दिसणार आहेत. 61 वर्षांच्या जॉनी लीवर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण खुप कमी लोकांना माहिती असेल की, चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी त्यांनी खुप स्ट्रगल केला आहे. आंध्र प्रदेशच्या कनिगिरीमध्ये तेलुगु क्रश्चियन कुटूंबात जन्मलेल्या जॉनीच्या घरची परिस्थिती खुप वाईट होती. यामुळे ते फक्त सातवीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना रस्त्यांवर पेनही विकावे लागेल होते. सुनील दत्त यांची त्यांच्यावर नजर गेली आणि त्यांनी जॉनी यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. जॉनीने 1982 मध्ये 'दर्द का रिश्ता' मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. 

 

बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करुन विकायचे पेन 
- जॉनी पैसे कमावण्यासाठी मुंबईत आले होते. येथे पोट भरण्यासाठी त्यांनी रस्त्यांवर पेन विकणे सुरु केले. ते बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करत आणि अॅक्टर्सची नक्कल करुन पेन विकायचे. 
- येथेच त्यांचे मिमिक्री टॅलेंट डेव्हलप झाले. या कामात त्यांची मदत मिमिक्री आर्टिस्ट प्रताप जैन आणि राम कुमारने केली. 

- जॉनी यांनी मुंबईच्या हिंदुस्तान लीव्हर कंपनीमध्ये आपल्या वडिलांसोबत काम केले आहे. येथे काम करतानाही ते आपल्या कॉमेडी टॅलेंटने कलीग्सला हसवायचे. हळुहळू ते फॅक्ट्रीचे दूसरे कर्मचारी आणि अधिका-यांमध्ये प्रसिध्द झाले. येथे त्यांना जॉनी लीवर हे नाव मिळाले. 

 

सुनील दत्त यांनी दिली होती पहिली संधी 
जॉनी नंतर कामासोबतच हळुहळू शोही करु लागले. यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. एकदा जॉनी स्टेज शोमध्ये अॅक्टर्सची मिमिक्री करत होते. यावेळी सुनील दत्त यांनी त्यांना पाहिले आणि त्यांचे टॅलेंट ओळखले. सुनील दत्त यांनी 1982 मध्ये त्यांना 'दर्द का रिश्ता' मध्ये काम करण्याची संधी दिली. 


'बाजीगर'मधून मिळाली ओळख 
जॉनीला चित्रपटांमध्ये काम मिळाले. पण त्यांना ओळख मिळाली नव्हती. यामुळे जॉनी आपल्या सक्सेसचे क्रेडिट 'दर्द का रिश्ता'ला देत नाही, तर 'बाजीगर' या चित्रपटाला देतात. ते म्हणतात की, 'बाजीगर'मध्ये त्यांना खुलून काम करण्याची संधी मिळाली होती. एकेकाळी आर्थिक अडचणींचा समान केलेल्या जॉनी यांची आज 190 कोटींची प्रॉपर्टी आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सुजाता आहे. त्यांना दोन मुलं आहेत, मुलगी जैमी आणि मुलगा जैसी. त्यांची मुलगीही स्टँड-अप कॉमेडियन आहे.

 

शब्द कोडे भरण्याचा आहे शौक 
जॉनी लीवर यांची मुलगी जैमी सांगते की, तिचे वडील सकाळी-सकाळी वर्ल्ड पजल खेळतात. यासोबतच ते रोज सकाळी शब्द कोडेही भरतात. वडिलांना साउथ इंडियन डिश आवडतात. ते कुठेही गेले तरी साउथ इंडियन रेस्तरॉ शोधत असतात. सांभर आणि राइस त्यांची फेव्हरेट डिश आहे.

 

या चित्रपटांमध्ये केले आहे काम 
जॉनी यांनी आतापर्यंत जवळपास 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 'बाजीगर', 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी', 'करन-अर्जुन', 'जुदाई', 'राजा हिंदुस्तानी', 'कोयला', 'इश्क', 'दूल्हे राजा', 'अनाड़ी नंबर वन', 'हद कर दी आपने', 'मेला', 'आवारा पागल दीवाना', 'चलते चलते', 'हाउसफुल 2', 'एंटरटेनमेंट', 'दिलवाले' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...