आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महमूद यांच्या एका थापडेने उतरले होते राजेश खन्नांचे स्टारडम, अमिताभ बच्चन यांना म्हणाले होते कृतघ्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदवीर म्हणून ओळखले जाणारे महमूद यांची आज (29 सप्टेंबर) 86वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे.  1932 साली आजच्या दिवशी जन्मलेल्या महमूद यांनी आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अविस्मरणीय केल्या. 'भूत बंगला', 'पडोसन', 'बॉम्बे टू गोवा', 'गुमनाम', 'कुंवारा बाप' यासह 300 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. महमूद रागिट स्वभावाचे होते. याच कारणामुळे एकदा त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर सेटवर हात उगारला होता.


ही होती घटना... 
ही गोष्ट 1979 ची आहे. झाले असे की, महमूद यांनी त्यांच्या 'जनता हवलदार' या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना साइन केले होते. राजेश खन्ना त्याकाळातील सुपरस्टार होते आणि त्यांचे एक वेगळेच स्टारडम होते. महमूद यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर चित्रपटाचे शूटिंग ठेवले होते. शूटिंगच्या काळात एकेदिवशी महमूद यांच्या मुलाने राजेश खन्नांना बघितले आणि त्यांना हॅलो म्हणून तिथून निघून गेला. यामुळे राजेश खन्ना अतिशय नाराज झाले आणि ते त्या दिवशी सेटवर कुणाशीही बोलले नाहीत. या घटनेनंतर राजेश खन्ना कायम सेटवर उशीरा येऊ लागले. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग खोळंबू लागले. राजेश खन्नांमुळे महमूद यांना तासन्तास वाट बघावी लागली. महमूद या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि त्यात ते अभिनयदेखील करत होते. एकेदिवशी राजेश खन्ना यांच्या उशीरा येण्यावरुन महमूद यांचा त्यांच्याशी वाद झाला आणि त्यांनी सेटवर सर्वांदेखत राजेश खन्नांवर हात उगारला. महमूद म्हणाले होते, तू सुपरस्टार असशील तुझ्या घरी.. माझा चित्रपट करण्यासाठी मी तुला पैसे दिले आहेत, त्यामुळे तुला वेळेत शूटिंग पूर्ण करावे लागले. या घटनेनंतर राजेश खन्ना वेळेत सेटवर येऊ लागले आणि ठरलेल्या दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. 


अमिताभ यांना म्हटले होते कृतघ्न...

'बॉबे टू गोवा' या चित्रपटातून महमूद यांनी अमिताभ बच्चन यांना मोठा ब्रेक दिला होता. अमिताभ यांना महमूद मुलाप्रमाणे समजायचे. पण निधनाच्या काही दिवसांपूर्वी महमूद आणि अमिताभ यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले होते. एकदा अमिताभ त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेऊन गेले होते. त्याच हॉस्पिटलमध्ये महमूद अॅडमिट होते. तेव्हा त्यांची बायपास सर्जरी झाली होती. महमूद यांनी मुलाखतीत सांगितले होते, की मी तेथे अॅडमिट होतो. पण अमिताभ मला एकदाही भेटायला आले नाही. अमिताभ यांनी असे वागून खरा आणि खोटा बाप कोण हे सांगितले आहे. बातम्यांनुसार, महमूद यांनी अमिताभ यांना कृतघ्न म्हटले होते. 


खेळता खेळता मिळाला होता ब्रेक... 
दादा मुनी अर्थातच अशोक कुमार त्यांच्या 'किस्मत' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यांना बालकलाकाराची गरज होती. महमूद बालपणी अतिशय खोडकर होते. त्यांची नजर या लहान मुलावर पडली. जिथे शूटिंग सुरु होते, तिथेच लहानगे महमूद खेळत होते. अशोक कुमार यांना लहानगे महमूद फिल्मसाठी अगदी योग्य वाटले आणि अशोक कुमारांनी महमूद यांना चित्रपटात संधी दिली. 


'कुँवारा बाप' मध्येही होती त्यांचीच स्टोरी...  
'कुँवारा बाप' हा महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता.

 

हीरोपेक्षा जास्त फीस घ्यायचे महमूद... 
सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते. 'सु्ंदर' सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना 2 लाख रुपये तर महमूद यांना 8 लाख रुपये मानधान मिळाले होते. असेच 'हमजोली' सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.

 

किशोर कुमार यांना घाबरायचे.... 
महमूद यांना अनेक लोक घाबरत होते, मात्र ते स्वत: किशोर कुमार यांना घाबरायचे. महमूद म्हणायचे, की कोणता अभिनेता किती पाण्यात आहे हे त्यांना चांगले ठाऊक होते. पण किशोर कुमार यांच्याविषयी असा अंदाज लावणे कठीण होते. जसे महमूद त्यांच्या अभिनयासाठी हटके होते, तसेच किशोर कुमारसुध्दा वेगळ्या अभिनयासाठी ओळखले जात. किशोर दा यांच्यासह महमूद यांनी 'पडोसन' सिनेमा केला होता. दोघांवर चित्रीत करण्यात आलेले सिनेमाचे 'एक चतुरनार वडी होशियार' हे गाणे आजही लोकप्रिय आहेत.

 

सात बहीणभावंड होते महमूद... 
सात बहीण-भावंडांमध्ये ते दुस-या नंबरवर होते. त्यांच्या थोरल्या बहिणीचे नाव हुसैनी होते आणि इतरह बहीण-भावंडांचे नाव खैरुन्निसा, जुबैदा, मलिकुंनिसा (मीनू मुमताज), उस्मान अली, शौकत अली आणि अनवर अली असे आहेत.

बातम्या आणखी आहेत...