आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Comedian Rajpal Yadav Become Third Time Father Of Daughter At The Age Of 47, His Second Wife Radha Blessed With A Baby Girl

​वयाच्या 47 व्या वर्षी तिस-या मुलीचा बाबा झाला कॉमेडियन राजपाल, दूस-या पत्नीने दिला मुलीला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कॉमेडियन आणि अॅक्टर राजपाल यादव वयाच्या 47 व्या वर्षी पुन्हा एकदा बाबा झाला आहे. नवरात्री फेस्टिव्हलच्या काळातच राजपालची दूसरी पत्नी राधाने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः राजपालने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही बातमी सांगितली, "माझी लहान मुलगी हनी आता मोठी बहीण बनली आहे. नवरात्रीच्या शुभ प्रसंगी आम्हाला अजून एक मुलगी झाली आहे." राजपालला तीन मुली आहेत. खरेतर राजपलने दोन लग्न केले आहे. पहिली पत्नी करुणा(आता हयात नाही) यांना एक मुलगी ज्योती आहे. तिचे लग्न 2017 मध्ये बँक कॅशियरसोबत झाले. ज्योतीच्या जन्माच्या वेळीच तिची आई करुणा यांचे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर ज्योती जवळपास 15 वर्षे गावात राहिली. परंतु लग्नापुर्वी 5 वर्षांपासून ती वडिलांसोबत मुंबईत राहत होती. तर राजपाल यादवची दुसरी पत्नी राधाला एक मुलगी हनी आहे आणि राधाने दूस-या मुलीला जन्म दिला आहे. 


10 महिने झालेल्या बातचित दरम्यान राजपालने केले होते लव्ह मॅरेज 
- 2002 मध्ये राजपाल फिल्म 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय'च्या शूटिंगसाठी कनाडा येथे गेला होता. तिथेच एका कॉमन फ्रेंडने त्याची ओळख राधासोबत करुन दिली. 
- दोघं कनाडा शहराच्या कॅलगरी कॉफी शॉपमध्ये भेटले होते. या मीटिंगमध्ये कपलने आपली प्रोफेशनल आणि पर्नसल लाइफच्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या होत्या. तिथे 10 दिवस ते एकत्र राहिले आणि दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. 
- 10 दिवस पुर्ण झाल्यानंतर राजपाल पुन्हा भारतात आले. परत आल्यानंतरही त्यांची मैत्री तुटली नाही. दोघं फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते. 
- जवळपास 10 महिने फोनवर कनेक्ट राहिल्यानंतर राधाने भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. भारतात शिफ्ट झाल्यानंतर दोघांनी 10 जून 2003 मध्ये लग्न केले. 
- राजपालची पत्नी राधा त्याच्यापेक्षा जवळपास 9 वर्षे लहान आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः राजपालने एका मुलाखतीत केला होता. 
- 5.2 फूटच्या राजपालने राधासोबत लव्ह मॅरेज केले आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, "लोकांना वाटते की, ती माझ्यापेक्षा खुप उंच आहे. परंतु खरेतर ती फक्त 1 इंच उंच आहे."
- कॉमिक अंदाजासाठी ओळखल्या जाणा-या राजपालने फिल्मी करिअरची सुरुवात 1999 मध्ये 'दिल क्या करे' चित्रपटातून केली होती. मोठ्या भूमिका न मिळाल्यामुळे त्यांनी लहान-लहान भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान मिळवले. 

बातम्या आणखी आहेत...