आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांसाठी धर्मशाळेत गेली होती \'कॉमेडी सर्कस\'ची अॅक्ट्रेस, भितीपोटी ट्रिप अर्धवट सोडून परतली मुंबईत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: वेब सीरिज 'रागिनी एमएमएस रिटर्न्स'ची अभिनेत्री करिश्मा शर्मा नुकतीच सुट्यांसाठी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेत गेली होती. परंतू एका भयावह अनुभवानंतर तिला ट्रिपमध्येच सोडून मुंबईत परतावे लागले. करिश्मानुसार, "मी माझ्या व्यस्त शेड्यूलमधून ब्रेक घेऊन धर्मशाळेत गेले होते. एक दिवस मी माझ्या फ्रेंडसोबत एका मंदिरात गेले आणि आम्ही तिथे काही फोटोजही काढले. परंतू मी वळून पाहिले तेव्हा 15 लोकं माझ्यामागे उभे राहून मला एकटक पाहत होते. यानंतर मी खुप घाबरले आणि तिथून पळाले. पुढे मला एक पोलिस भेटला तेव्हा मी त्यांना सांगितले की, माझ्यासोबत छेडछाड झाली आहे, परंतू तो हसत म्हणाला की, कोण छेडत आहे. येथे तर कुणीही नाही. त्याचे उत्तर ऐकूण मी हैराण झाले."


करिश्माच्या अडचणी येथे संपल्या नाहीत 
करिश्माच्या अडचणी येथेच संपल्या नाहीत. तिने सांगितले की, 'मी ही घटना विसरुन स्ट्रीट शॉपिंगसाठी गेले. परंतू येथे मला वाटले की, काही लोक आमचा पाठलाग करत आहेत. मी मागे वळून पाहिले तर तेसुध्दा वळाले. यानंतर आम्ही खुप घाबरलो आणि तात्काळ एका दुकान गेलो. या काळात मी एका व्यक्तीला ओळखले. यानंतर आम्ही पाहिले की, लोक धारदार शस्त्र घेऊन उभे होते. एका क्षणासाठी मला तर वाटले की, हे लोक माझे अपहरण तर करणार नाहीत ना, कारण ते लोक एकटक पाहत आमच्याजवळ येत होते.'

 

भयानक अनुभवामुळे दोन दिवसांपुर्वीच ट्रिस सोडून मुंबईत पळाली करिश्मा 
करिश्माने पुढे सांगितले, "दूस-या दिवशी मी एका मठात गेले आणि मी काही लोकांना माझ्यासोबत व्हिडिओ बनवताना रेकॉर्ड केले." या वाईट अनुभवामुळे घाबरलेल्या करिश्माने ट्रिप पुर्ण होण्याच्या 2 दिवसपुर्वीच धर्मशाळा सोडली आणि मुंबईत परतली. करिश्मानुसार, "धर्मशाळेल्या परिसरात फिरणे खुप भितीदायक होते. तेथे लोक एकटक पाहायचे आणि गाणे गायचे. मी तिथे 4 दिवस थांबणार होते, परंतू भयानक अनुभवामुळे 2 दिवसातच मी ट्रिप संपवली. धर्मशाळा खुप सुंदर ठिकाण आहे, पण माझा अनुभव वाईट होता."

 

 

बातम्या आणखी आहेत...