आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीबाहेर तिसऱ्यांदा आशियामधील मोठ्या हवाई तळावर कमांडर कॉन्फरन्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याचे पराक्रम पर्व साजरे करण्यासाठी जोधपूरला आवर्जून हजेरी लावली. आशियातील सर्वात मोठ्या संरक्षण तळ असलेल्या जोधपूरहून मोदींनी सकाळी ९ ते ३ या दरम्यान तीनही सैन्य दलांशी ज्वॉइंट-पॉइंटवर चर्चा केली. तत्पूर्वी कोणार्क युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधानांनी शहिदांना नमन करतानाच शस्त्रास्त्र प्रदर्शनाचेही उद््घाटन करून पराक्रम पर्वाची सुरुवात केली. तेथे स्टेडियममध्ये शहिदांच्या नावे संदेशही लिहिला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, लष्करप्रमुख बिपिन रावत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. त्यानंतर मोदी जोधपूर तळावर कमांडर कॉन्फरन्सचे उद््घाटन झाले आहे. ही कॉन्फरन्स ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. दिल्लीच्या बाहेर हे तिसरे आयोजन आहे.


> विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य 
१५ डिसेंबर २०१५ : सैन्याच्या माउंटन स्ट्राइकला बळकट करण्यासाठी दिले ६४ हजार कोटी
व्यूहरचना :
हिंदी महासागरात चीन, अमेरिकेसारख्या देशांच्या नौदलांचा वाढता दबदबा लक्षात घेऊन आयएनएस विक्रमादित्यची निवड झाली. 
कूटनीती : पाकिस्तानातील चीनचे सैन्य तळ, श्रीलंकेचे हंबनटोटा तसेच बांगलादेशात नौदलाच्या तळांना कूटनीतीनेच उत्तर देण्याचे धोरण स्वीकारले 
चर्चेचे विषय : मोदींनी या कॉन्फरन्समध्ये सैन्याला आधुनिकीकरण व विस्तार एकाच वेळी अशक्य असल्याचे सांगितले. माउंटन स्ट्राइक कोर तयार करण्यासाठी ६४ हजार कोटींचे आश्वासन दिले.


> इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून
२१ जानेवारी २०१७ :सर्जिकल स्ट्राइक, डोकलामनंतरची पहिली परिषद असल्याने महत्त्व 
व्यूहरचना :
हे ठिकाण उत्तरेत पाकिस्तान व चीन जवळ आहे. ५ राज्यांतील निवडणुकीपूर्वी त्याचे आयोजन असल्याचे मोदींचे भाषण व त्याची माहिती जाहीर केली गेलेली नाही.
कूटनीती : चीन व पाकिस्तानची सीमा येथून जवळ आहे. त्यात उत्तरेकडील सीमेवरच संपूर्ण लक्ष केंद्रीत होते.सर्जिकल स्ट्राईकनंतरची पहिली बैठक 
चर्चेचे विषय : सर्जिकल स्ट्राइकनंतरची परिस्थिती, एलआेसीवरील स्थिती,  युद्ध बंदीचा आढावा.


> जोधपूर हवाई दलाचे तळ 
२८ सप्टेंबर २०१८ :पाकला सर्जिकल स्ट्राइकचे स्मरण करून देणे हा उद्देश
व्यूहरचना :
आशियातील सर्वात शक्तिशाली हवाई दलाच्या जोधपूर येथील तळावर अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांच्या सैन्याने युद्ध सराव केला आहे. यंदा फेब्रुवारीत अमेरिकेचे हवाई दलप्रमुख डेव्हिड एल. गोल्डफिन तसेच फ्रान्सचे आंद्रे लेटना यांनी स्वदेशी लढाऊ विमान तेजसचे उड्डाण यशस्वी करून पाकिस्तानला चकीत केले होते.
कूटनीती : पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच्या सर्जिकल स्ट्राइकचे पाकला स्मरण करून देण्यासाठी  हे ठिकाण निवडले होते.


चीनच्या संरक्षण तयारीच्या तुलनेत ३० वर्षे मागे
तीनही सैन्य दलाच्या कमांडर्सची वार्षिक संयुक्त बैठकी स्वातंत्र्यानंतर सातत्याने होत आहेत. पण ठोस निर्णय होत नाही. त्यामुळेच या बैठकांचे स्वरूप वार्षिक उपचारासारखे होऊन बसले आहे. त्यात क्रमाक्रमाने तीन सैन्य दलांच्या प्रमुखांचे सादरीकरण होते. पण  सुरक्षेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांशी चर्चा करण्याचे हे चांगले व्यासपीठ ठरते. खरे तर महत्त्वाचे निर्णय दिल्लीतच होतात. पहिल्यांदाच त्यांचे आयोजन दिल्लीबाहेर झाले. आपल्या संरक्षण धोरणांच्या तयारीची गती मंद आहे. त्याची पूर्तता १५ ते २० वर्षांत होते. त्यामुळेच आपण चीनच्या तुलनेत ३० ते ४० वर्षे पिछाडीवर आहोत. 
- अॅडमिरल अरुण प्रकाश, माजी नौदल अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...