आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासावरून राजकारण नकोच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत गदारोळ झाला. वास्तविक पाहता इतिहास लिहिण्याचे वेगवेगळे दृष्टीकोण असतात. साम्राज्यवादी, हिंदूवादी, साम्यवादी या दृष्टीकोनातून संपूर्ण भारतीय इतिहास लिहीला गेला. यात प्रत्येकाला अभिव्यक्ती असते. मात्र मी म्हणतो तसा इतिहास लिहा ही अरेरावी इतिहास संशोधनात चालत नाही. तसेच श्रीमान बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वता सांगितले आहे की, मी इतिहासकार नसून कादंबरीकार आहे.
इतिहास व कादंबरी यात खूपच फरक आहे. तरी सुद्धा विरोधी जातीपातीचे राजकारणाचा अंतर्भाव दिसतो. अशात आमच्या सारख्या नवोदित लेखकांनी शिवरायांबद्दल लिहायचे की नाही असा प्रश्न पडतो? मतभेद असावे मात्र गदारोळ व दहशतीचे वातावरण नको.