आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकांवर टीका; महिला काँग्रेस नोंदवणार गुन्हे, सोशल मीडियावर डर्टी कॅम्पेनमध्ये अश्लील टिपणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रियंका गांधी यांच्यावर सोशल मीडियावर व्यक्तिगत टीका करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार असल्याचे राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी सांगितले. देव दिल्लीत तर इतर राज्यांतील महिला काँग्रेसच्या अध्यक्ष त्या त्या राज्यांत सोमवारी एफआयआर दाखल करतील, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली. 

 

सुश्मिता देव म्हणाल्या की, प्रियंका यांच्यावर आता व्यक्तिगत पातळीवर टीका होत आहे. देशात राजकारणातील महिलांची संख्या कमी आहे. त्यातच ज्या महिला राजकारणात येतात त्यांच्यावर इतर राजकीय पक्षांचे नेते वादग्रस्त भाष्य करतात. अशी टीका केल्यामुळे महिला राजकारणात येण्याचे टाळतील, असे त्या नेत्यांना वाटते. 

 

प्रियंका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेले डर्टी कॅम्पेन अत्यंत गंभीर असून महिला काँग्रेस त्याविरोधात गुन्हे दाखल करणार आहे. हा लढा फक्त प्रियंका यांच्या विरोधात नसून सर्व महिलांसाठी आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधी सोमवारपासूनच नव्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. 
 

 

बातम्या आणखी आहेत...