आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नागरिकत्व' कायद्याविरोधात देशभरातील आंदोलनावर भाष्य, 'आपण पाकिस्तान हाेत चाललाे आहाेत' : नेमाडे

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'देशात सध्या जो हिंसाचार चालू आहे, ते अराजकतेचे लक्षण आहे. हे वाढतच जाणार आहे. आपल्याला यातून बाहेर पडता येणे कठीण आहे़. आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरू आहे. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत,' अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनावर भाष्य केले.

नेमाडे व प्रसिद्ध हिंदी कथाकार ज्ञानरंजन यांना शनिवारी सायंकाळी 'आकाशदीप' सन्मान कवी गुलजार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माध्यमांशी बोलताना नेमाडे म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग आहे. राजकारणी लोकांचा हा विषय नाही. सर्वसामान्य माणसाने आपले आयुष्य नीट काढावे इतकीच आपली अपेक्षा असते. खरे म्हणजे हा विषय इतक्या माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत जाणे हेही चुकीचेच आहे. हा प्रश्न ठरावीक तज्ञ लोकांनी सोडवावा, असा सल्ला देत दुर्दैवाने लोक रस्त्यावर यायला लागले आहेत, असे नेमाडे म्हणाले.

गुलजारही म्हणतात, अब दिल्लीवालाें से डर लगता है

नेमाडे व प्रसिद्ध हिंदी कथाकार ज्ञानरंजन यांना शनिवारी सायंकाळी मुंबईतील यशवंतराव चव्हाणमध्ये 'आकाशदीप' सन्मान कवी गुलजार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 'दिल्लीवालों सेे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं' असे म्हणत गुलजार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
 

बातम्या आणखी आहेत...