Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Committee for deeper inquiry into Avani death case

अवनी मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत

वृत्तसंस्था | Update - Nov 10, 2018, 09:07 AM IST

‘अवनी’ने केबीसी स्पर्धकाला जिंकून दिले ३ लाख २० हजार रूपये.

  • Committee for deeper inquiry into Avani death case

    नागपूर - टी 1 वाघीण अवनी मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.


    वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य श्री बिलाल , वन्यजीव संवर्धन ट्रस्ट चे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.


    ‘अवनी’ने केबीसी स्पर्धकाला जिंकून दिले ३ लाख २० हजार रूपये... अवनीने ‘कौन बनेगा कराेडपती’ या शोमध्ये एका स्पर्धकाला ३ लाख २० हजार रूपये जिंकून दिले. शुक्रवारी प्रसारित कार्यक्रमात अलिमा खातून या स्पर्धकाला अमिताभ बच्चन यांनी अवनीविषयी प्रश्न विचारला. मछली, माया, अवनी व सोनम हे चार पर्याय दिले. अलिमा यांनी आस्क दी एक्सपर्ट या लाईफलाईनचा वापर करीत ३ लाख २० हजार रूपये जिंकले.

Trending