आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरेगाव भीमा, मराठा माेर्चातील दाखल गुन्हे मागे घेण्यास समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणानंतर उसळलेल्या आंदोलनात तसेच मराठा माेर्चातील सहभागी असलेल्या आंदोलकांवरील खटले मागे घेण्याच्या दृष्टीने सरकारची तयारी सुरू आहे.  यासाठी अपर पाेलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला अाहे. काेरेगाव भीमा येथे  १ जानेवारीला दंगल उसळली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी झालेल्या अांदाेलनाला हिंसक वळण लागले. या घटनेपाठाेपाठ मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जुलै-अाॅगस्ट महिन्यात माेठ्या प्रमाणावर अांदाेलने झाले. या दाेन्ही प्रकरणांत विविध अांदाेलकांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले हाेते.  

 

परंतु अाता या अांदाेलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागाने कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अपर पाेलिस महासंचाकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यात राज्याचे पाेलिस महासंचालक दोन पाेलिस महानिरीक्षकांची नावे सुचवणार असल्याचे आदेशात म्हटले अाहे. काही संघटनांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. तर आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता मराठा तसेच अांबेडकरी चळवळीतील संघटनांना नाराज करणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही, हे लक्षात घेऊन राज्य सरकार गुन्हे मागे घेऊन अांदाेलकांना दिलासा देण्याचा विचार करत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...