Home | Maharashtra | Pune | Common Man attacked on Police constable inside police station in Pune

पुण्यात पोलिस स्टेशनमध्ये शिरून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण; व्हिडिओ होतोय व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 27, 2018, 06:18 PM IST

साहेबगौडा पाटील यांनी ड्युवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला लाथा-बुक्क्यानी मारहाण केली.

  • Common Man attacked on Police constable inside police station in Pune
    पुणे- पुण्यातील एका पोलिस स्टेशनमधील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तिने थेट पोलिस स्टेशनमध्ये शिरून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहेबगौडा पाटील (वय 49) असे आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलिस स्टेशनमधील ही घटना आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाकाबंदी दरम्यान आरोपी साहेबगौडा पाटील याच्या अल्पवयीन मुलाने आपल्या दुचाकीने अनेकांना ठोकरले. स्थानिक लोकांनी मुलाला बकडू त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले.

    पोलिसांनी मुलाचे वडील साहेबगौडा यांना याबाबत माहिती देऊन त्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. साहेबगौडा हे पोलिस स्टेशमध्ये पोहोचले. त्यांनी मुलाला जखमी अवस्थेत पाहिले. त्यांना वाटले की, पोलिसांनी आपल्या मुलाला मारहाण केली आहे. नंतर साहेबगौडा पाटील यांनी ड्युवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला लाथा-बुक्क्यानी मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

Trending