आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Commonwealth Games Includes Women's Cricket For The First Time

राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या क्रिकेटचा समावेश; २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे स्पर्धेचे आयाेजन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न -  महिलांच्या टी-२० क्रिकेटचा आता राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी तीन वर्षांनंतर बर्मिंगहॅम येथे हाेणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेट सामन्यांचेही आयाेजन केले जाईल. त्यामुळे आता २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी-२० क्रिकेटचा समावेश आहे. आठ संघांचा या स्पर्धेत सहभाग असेल. एकूण आठ सामने हाेतील. या स्पर्धेत एकूण १९ खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 
 
१९९८ मध्ये मलेशियातील राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला हाेता. यादरम्यान फक्त पुरुषांच्या गटाचा समावेश हाेता. या ५० षटकांच्या स्पर्धेत त्यादरम्यान १६ संघांनी सहभाग घेतला हाेता. यात दक्षिण आफ्रिकेचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला हाेता. 

२०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा ही २७ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान आयाेजित करण्यात येणार आहे. यात क्रिकेटच्या समावेशानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. कारण, यादरम्यानच्या लाेकप्रियेवरच आयसीसीच्या पुढील याेजनेचे यश-अपयश अवलंबून आहे. कारण, २०२८ च्या आॅलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट खेळ प्रकाराचा समावेश करण्यासाठी आयसीसीने कंबर कसली. 

पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांना अधिक पदके :
राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला. त्यामुळे साहजिकच महिला खेळाडूंची या स्पर्धेतील संख्याही वाढणार आहे.
 
१९९८ मध्ये मलेशियातील राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला हाेता. त्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा  संघ सुवर्णपदकाचा मानकरी  ठरला हाेता. तेव्हा पहिल्यांदाच फायनल जिंकणाऱ्या संघाला ट्राॅफीएेवजी पदक देऊन गाैरवण्यात आले हाेते. या फायनलमध्ये आफ्रिकेने आॅस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात केली हाेती. आॅ‌स्ट्रेलिया संघाचा प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत अवघ्या १८३ धावांवर धुव्वा उडाला हाेता. प्रत्युत्तरात आफ्रिकेने ४६ षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.  संघाकडून माइक रिंडेलने सर्वाधिक ६७ धावांची  खेळी केली हाेती. न्यूझीलंडचा संघ कांस्यचा मानकरी ठरला.
 

३ सामन्यांत २८ धावा सचिनच्या
टीम इंडियाने १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत नववे स्थान पटकावले हाेते. सहारा चषकमुळे भारताने या स्पर्धेत अत्यंत दुबळा संघ पाठवला हाेता. मात्र, तरीही संघात सचिनसह हरभजन, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुुंबळेसारख्या माेठ्या खेेळाडूंचा समावेश हाेता. सचिनने यादरम्यानच्या तीन सामन्यांत फक्त २८ धावा काढल्या हाेत्या. टीमने तीन सामने  खेळले. यात एक विजय, एक पराभव  झाला व एक सामना रद्द झाला हाेता.