आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Commonwealth Games To Be Held In India; Birmingham Commonwealth Championships To Be Held In India Before 2022

भारतात होणार कॉमनवेल्थ गेम्स; गुण कॉमनवेल्थ गेम्सच्या तालिकेत जोडणार, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ 2022 पूर्वी भारतात होणार चॅम्पियनशिप

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील नेमबाजी खेळाला बाहेर केल्यानंतर भारताने कडाडून विरोध केला होता. ते पाहता आता २०२२ मध्ये कॉमनवेल्थ नेमबाजी चॅम्पियनचे आयोजन केले जाऊ शकते. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या गेम्सच्या तीन महिने पहिले भारतात कॉमनवेल्थ नेमबाजी चॅम्पियनशिप होईल. या स्पर्धेतील गुण कॉमनवेल्थ गेम्सच्या तालिकेत जोडले जातील. त्यासाठी कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (सीजीएफ) आणि भारतीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) व भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशन (एनआरएआय) यांच्यात एकमत झाले. मात्र, सीजीएफने भारतीय ऑलिम्पिक महासंघाला (आयओए) त्यासाठी औपचारिक प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. सीजीएफकडून आयओएला पत्र पाठवून म्हटले की, आयएसएसएफने कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपच्या अायोजनास मान्यता दिली. अशात जानेवारीत कॉमनवेल्थ स्पोर्ट््स समितीच्या बैठकीत त्यावर औपचारिक निर्णय घेतला जाईल. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स संचालक मंडळाची परवानगी मिळवण्याची अाशा आहे.

भारताच्या बाजूने हा निर्णय पाच डिसेंबर रोजी म्युनिचमध्ये सीजीएफ व आयएसएसएफच्या अधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीनंतर झाला. या बैठकीनंतर एनआरआयने त्याच्या भारतात आयोजनासाठी मान्यता दिली. मात्र, ही स्पर्धा भारतात कुठे घेण्यात येईल हा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.


सीजीएफने आयओए अध्यक्ष नरिंदर बत्राला पत्र लिहून म्हटले की, एनआरएआय भारत सरकार व आपल्यासोबत मिळून प्रस्ताव तयार करेल. आम्ही तो प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी पाठिंबा देऊ.'

पंजाब व मध्य प्रदेशची दावेदारी


कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पंजाब व मध्य प्रदेश मजबूत दावेदार आहेत. ही स्पर्धा पंजाबच्या चंदिगड किंवा मोहाली व एमपीतील भोपाळच्या रेंजवर होऊ शकते.

कॉमनवेल्थ डेच्या दिवशी होऊ शकते स्पर्धेला सुरुवात

रनिंदर सिंगने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेल्या पदकांना कॉमनवेल्थच्या तालिकेत जोडण्याचादेखील प्रस्ताव दिला. त्यांनी म्हटले की, या स्पर्धेला १४ मार्च २०२२ म्हणजे कॉमनवेल्थ डेच्या दिवशी सुरू करता येऊ शकते. चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी भारत सरकारकडून परवानगीसाठी मदत करण्याची विनंती रनिंदरने बत्रा यांना केली. आयओएने २०२२ कॉमनवेल्थ गेम्समधून नेमबाजीला बाहेर केल्याचा विरोध केला होता.

क्रीडाग्राममध्ये खेळाडूंचे आई-वडील थांबणार नाहीत : बत्रा

आता कोणत्याही मोठ्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंसोबत त्याचे आई-वडील थांबू शकणार नाहीत. आम्ही आता क्रीडाग्राममध्ये खेळाडूंच्या आई-वडिलांना थांबण्यासाठी परवानगी देणार नाही, असे आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी म्हटले. alt147जर कोणत्या खेळाडूला आई-वडिलांना सोबत आणायचे असेल तर त्यांना मी विरोध करणार नाही. त्यांची व्यवस्था त्यांना हॉटेलमध्ये करावी लागेल. जर खेळाडूद्वारे मला धमकी दिली गेली, तर मी दुसऱ्या दिवशी टीव्हीवर सांगेल, संबंधित खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करण्यास तयार नाही असे सांगेल.'