आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरून निर्माण झालेल्या अनेक शंकांचे निरसन केले. अर्थसंकल्प रोजगारवाढीचा असल्याचे त्या पुन्हा म्हणाल्या. मात्र, ठोस आकडा दिलाच नाही. अनिरुद्ध शर्मा यांच्याशी त्यांनी केलेली बातचीत...
तुम्ही रोजगार वाढीचा दावा केला आहे. किती रोजगार उपलब्ध होतील?
उत्तर : मी आकडा दिला नाही हे खरे आहे. आज तो सांगणे कठीण आहे. समजा मी १ कोटी असा आकडा दिला तर १५ महिन्यांनंतर राहुल गांधी विचारतील, १ कोटी नोकऱ्यांचे काय झाले? तीन-चार महिन्यांनी मी आकडा देऊ शकेल. कदाचित मी ठोस आकडाही तेव्हा सांगू शकेन. ही एक प्रक्रिया आहे.
आयकरदाते दोन पर्यायांच्या संभ्रमात आहेत. तज्ञ म्हणतात, यातून बचत होणार नाही. काय सांगाल?
उत्तर : आजवर जी सरकारे आली त्यांनी करप्रणालीत सूट वाढवत नेली. याचा काहीही शास्त्रीय आधार नसतो. जगात कोणत्याच विकसनशील देशांत ही प्रणाली नाही. या दृष्टीने लोकांवर दबाव टाकायचा नव्हता. करदात्यांना वाटले तर सवलती न घेता त्यांनी पूर्ण कर भरावा आणि उर्वरित उत्पन्न आपल्या हिशेबाने खर्च करावे किंवा बचत करावी, असा पर्याय आम्ही दिला.
तुम्ही जीडीपीमध्ये १०% सांकेतिक वृद्धीचा अंदाज मांडला. हा नवा निकष आहे काय?
उत्तर : नाही... अर्थतज्ञ नेहमीच अर्थव्यवस्थेकडे दोन्ही दृष्टिकोनातून पाहतात.
टॅक्सपेअर चार्टरमध्ये काय असेल?
उत्तर : सध्या अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तीनच देशांत करदात्यांची अडचण होऊ नये म्हणून त्यापासून बचावाचा अधिकार दिला जातो. आम्हीही करदात्यांचे हे अधिकार सुरक्षित राहावेत म्हणून प्रयत्न करत आहोत. लवकरच चार्टर (सनद)जाहीर होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.