आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : नवीन वर्षांची सुरुवात झाली असून हे नवीन वर्ष देशातील बेरोजगारांसाठी चांगले ठरणार आहे. कारण या नवीन वर्षात सर्वात जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 2019 अनेक कंपन्या अधिकाधिक कर्मचाऱ्यांची भर्ती करणार आहेत. ग्लोबल कन्सल्टिंग एचआर फर्म मर्सरच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मर्सरमध्ये भारताचे बिझनेस लीडर शांती नरेश यांनी सांगितले की, 2019 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची शक्यता वर्तविली आहे. यावर्षी फक्त 3 टक्के कंपन्या कमी भर्ती करणार आहेत.
सेल्स, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये आहे नोकरीच्या संधी
मर्सर इंडियाचे सीईओ अनीश सरकार यांनी सांगितले की, मागील 2 दोन वर्षांत अनेक नवीन भर्ती करण्यात आली आहे. तसेच यावर्षी सुद्धा अनेक भर्ती होणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. काही प्रमुख क्षेत्रांशिवाय सेल्स, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांची भर्ती होणार आहे. मर्सरचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी मुस्तफा फैजानी यांनी नोकरींवर पडणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या परिणामाविषयी बोलतांना सांगितले की, AI मधील काही नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत. पण अनेक नवीन नोकऱ्यांमध्ये वाढ देखील होणार आहे.
AI मुळे संपुष्टात येणार अनेक नोकऱ्या
AI मुळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकऱ्यांची संख्या वाढणार आहे. पण AI मुळे ज्या लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत नंतर त्यांना त्यांच्या कौशल्याच्या आधारावर नोकरी देणे खूप जिकरीचे काम होणार आहे. फैजानी यांनी सांगितले की, AI क्रेडिटधारकांकडून कर्ज मंजूर होण्याच्या अंदाजपत्रकाचा अंदाज घेण्याचे काम करीत आहे. या कामांसाठी माणसांची भासणारी गरज संपली आहे. AI मुळे कामाची गती देखील चांगलीच वाढली आहे. दोन लोकांचे काम AI क्षणार्धात करते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.