आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HONOR 20i vs Samsung M30- किंमत आणि स्पेसिफिकेशंसची तुलना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- स्मार्टफोन कंपन्यांनी या काही दिवसात मिड-रेंज सेगमेंटमध्ये अनेक लेटेस्ट फोन्स मार्केटमध्ये आणले आहेत. स्पेसिफिकेशंस पाहता, प्रत्येक फोनमध्ये काही चांगले तर काही खराब फीचर्स आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः तुलना करुन जाणून घेऊ शकता की, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कोणता फोन खरेदी करणे फायद्याचे ठरेल. येथे आम्ही तुमच्या सुविधेसाठी HONOR 20i आणि Samsung M30 ची तुलना करणार आहोत, जे मिड रेंजमधील चांगले स्मार्टफोन्स आहेत. जाणून घ्या यापैकी कोणता फोन तुमच्या गरजेमध्ये फीट बसतो.HONOR 20i vs Samsung M30- किंमत
 
किमतीबाबत बोलायचे झाल्यास, HONOR 20i च्या 4GB रॅम+128GB स्टोरेज मॉडलची सुरुवाती किंमत 14,999 रुपये होती, पण आता हा फोन तुम्हाला फ्लिपकार्ट आणि अमॅझॉनच्या फेस्टिव आफर्समध्ये अवघ्या 11,999 रुपयात मिळत आहे. दुसरीकडे, Samsung M30 च्या 6GB रॅम+128GB स्टोरेज मॉडलची किंमत 16,999 रुपये आहे,  तर याच्या 4GB रॅम+64GB स्टोरेज मॉडलची किंमत 12,499 आहे.

HONOR 20i vs Samsung M30 - डिझइन आणि डिस्प्ले
 
HONOR 20i फोनमध्ये ग्लास फिनिश बॉडीसोबत ड्यू ड्रॉप डिस्प्ले दिला आहे, तर Samsung M30 मध्ये प्लास्टिक बॉडीसोबत  ड्यू ड्रॉप डिस्प्ले आहे. HONOR 20i मध्ये 15.77 cm (6.21-इंच) FHD+ स्क्रीन आहे, तर Samsung M30 मध्ये 16.21 cm (6.4-इंच) FHD+ (अॅमोलेड) स्क्रीन आहे. दोन्ही फोन्स तुम्हाला 1080x2340 रिझॉल्यूशन, 19.5:9 अॅस्पेक्ट रेशियो आणि 90% स्क्रीन टु बॉडी रेशियोसोबत चांगला डिस्प्ले अनुभव देतात. HONOR 20i चा दावा आहे की, यात तुम्हाला 16.7M कलर्सचे प्रोजेक्शन मिळेल, तर Samsung M30 मध्ये 16M कलर्स मिळतील. दोन्ही फोन्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर आहे.HONOR 20i vs Samsung M30- परफॉरमंस 
 
>परफॉरमंसच्या बाबतीत, HONOR 20i किरीन 710 प्रोसेसर आणि ओक्टाकोर सीपीयूसोबत मिळतो. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली आहे, जी या फोनला फास्ट बनवते.
> Samsung M30 मध्ये एक्झीनॉस 7904 प्रोसेसर आणि ओक्टाकोर सीपीयू दिला आहे. रॅम आणि स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचे आहे, तर दुसऱ्या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिला आहे.HONOR 20i vs Samsung M30- कॅमेरा
 
>HONOR 20i मध्ये AI-इनेबल्ड ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप  दिला आहे. यात 24MP प्रायमरी लेंस, 8MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर दिला आहे. यात AI-इनेबल्ड 32MP सेल्फी कॅमरा दिला आहे.
> Samsung M30 मध्येदेखील ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप दिला आहे. यात 13MP प्रायमरी लेंस, 5MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर दिले आहे. यात 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.HONOR 20i vs Samsung M30- बॅटरी
 
> HONOR 20i मध्ये 3400mAh च्या बॅटरीसोबत उत्कष्ट बॅटरी मॅनेजमेंट फीचर्सदेखील दिला आहे. हा फोन तुम्हाला दिड दिवसांची बॅटरी लाइफ देतो.
 > Samsung M30 मध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळते.HONOR 20i vs Samsung M30- गरजेनुसार निर्णय घ्या
 
जर तुम्ही एक चांगला कॅमेरा आणि परफॉर्मंस असलेला फोन घेण्याच्या विचारात असाल, तर HONOR 20i पेक्षा चांगला फोन तुम्हाला या रेंजमध्ये मिळणार नाही. HONOR 20i मध्ये तुम्हाला फ्रंट कॅमरा 32MP ची मिळेल. तर Samsung M30 मध्ये फ्रंट कॅमरा 16MP चा मिळेल. HONOR 20i मेंरियर साइड कॅमरा तुम्हाला 24+8+2MP चि मिळेल, जो AI इनेबल्ड आहे. ट्रिपल कॅमरा सेटअप सोबत हा फोन तुम्हाला 11,999 रुपयात मिळेल. HONOR 20i मध्ये 128GB चे स्टोरेजदेखील मिळत आहे. Samsung M30 मध्ये तुम्हाला 12+5+5MP चा कॅमेरा मिळतो आणि 128GB स्टोरेजसाठी तुम्हाला अंदाजे 3 हजार रुपये जास्त मोजावे लागतील.
HONOR 20i चे किरीन 710 प्रोसेसर Samsung M30 च्या एक्झीनॉस 7904 प्रोसेसरपेक्षा चांगले आहे. किरीन 710 प्रोसेसरसोबत  HONOR 20i मध्ये गेमिंगचा अनुभवदेखील Samsung M30 पेक्षा चांगला मिळतो. दिसण्याच्या बाबतीत HONOR 20i आकर्षक आणि आणि Samsung M30 पेक्षा चांगला आहे, कारण याचे ग्रेडिएंट फिनिश बँक याला प्रीमियम आणि स्टाइलिश लुक देतो. दुसरीकडे Samsung M30 मध्ये नॉर्मल मॅट फिनिश बँक आहे.
जर तुम्ही बॅठरी परफॉर्मंसवर ज्यास्त लक्ष्य देत असाल, तर तुम्हाला Samsung M30 चांगला पर्याय आहे. पण, HONOR 20i मध्ये चांगले बॅटरी मॅनेजमेंट असल्यामुळे, या फोनमधे दिड दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.

बातम्या आणखी आहेत...