> इम्रानने निवडणूक प्रचारात मोदी आणि काश्मीरविरोधी वक्तव्ये केली.
> इम्रान खान म्हणाला होते- युद्ध झाल्यास भारतावर पाकिस्तान वरचढ ठरेल.
> एका सभेत इम्रान म्हणाले होते- मोदीला कसे उत्तर द्यायचे, ते मी नवाझला दाखवून देईन.
इस्लामाबाद/नवी दिल्ली - पाकिस्तानात तहरीक-ए-इंसाफचे प्रमुख इम्रान खान (65) देशाचे नवे वजीर-ए-आझम (पंतप्रधान) बनले आहेत. शेजारी देशातील सत्तेतील हा बदल भारतासाठी कसा राहील? यावर पी टीव्हीच्या राजकीय पत्रकार मोना आलम सांगतात की, हा विजय मिळवूनही इम्रानवर लष्कराचा दबाव राहील. यामुळे भारताविषयी त्याची नकारात्मक भावना राहण्याचा अंदाज आहे. परराष्ट्र धोरणांचे जाणकार रहीस सिंह सांगतात की, पाकिस्तानचे सैन्य नेहमी सरकारला आपली कठपुतळी बनवू इच्छिते. इम्रान यासाठी तयार झाले. नवे काहीच होणार नाही. भारताची आव्हाने कमी होणार नाहीत, कारण इम्रान हे भारतविरोधी आहे. पाकिस्तानचे निवडणूक विश्लेषक सय्यद मसरूर शहा म्हणतात की, इम्रान निवडून आल्याने भारतासोबतचे संबंध चांगले होणार नाहीत.
सैन्य ताकदीच्या बाबतीत कुठे आहेत भारत Vs. पाकिस्तान...
सैन्य ताकदीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. शेजारी देश चीन आपल्यापेक्षा पुढे आहे, चीन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु पाकिस्तानच्या सैन्य ताकदीत मात्र मोठी घट झाली आहे. गतवर्षी पाकिस्तान 13व्या क्रमांकावर होता. या वर्षी 17व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आधी भारतापेक्षा 9 क्रमांकांनी मागे होता. यंदा मात्र 13 ने मागे हटला आहे. सर्व देशांच्या सैनशक्तीचे दरवर्षी आकलन करणारी संस्था ग्लोबल फायर पॉवरच्या 2018 इंडेक्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेली आकडेवारी
ग्लोबल फायर पॉवरने 2018 च्या इंडेक्ससाठी 136 देशांच्या सैन्य ताकदीचे आकलन दिले. यात देशांची भौगौलिक स्थिति, उपकरणे-साधने एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची क्षमता, नैसर्गिक संसाधने आणि औद्योगिक समर्थनाच्या आधारे देशांना स्थान देण्यात आले आहे. देशाची आर्थिक स्थिरता आणि त्यांच्या संरक्षण बजेटला इंडेक्समध्ये प्रामुख्याने सामील करण्यात आले. इंडेक्समध्ये देशांची अणुशक्ती आणि तेथील राजकीय नेतृत्वाला स्थान देण्यात आलेले नाही.
सर्वात शक्तिशाली देश (लष्कर, नौसेना आणि वायुसेनाची ताकद मिळून)
स्थान |
देश |
पहिला |
अमेरिका |
दुसरा |
रशिया |
तिसरा |
चीन |
चौथा |
भारत |
पाचवा |
फ्रांस |
17वा |
पाकिस्तान |
सर्वात जास्त सैनिक असलेला देश
देश |
सैनिक संख्या |
चीन |
21.8 लाख |
भारत |
13.6 लाख |
अमेरिका |
12.8 लाख |
रशिया |
10 लाख |
उत्तर कोरिया |
9.45 लाख |
पाकिस्तान |
6.37 लाख |
सर्वात जास्त विमाने असलेला देश
देश |
विमाने |
अमेरिका |
13362 |
रशिया |
3914 |
चीन |
3035 |
भारत |
2185 |
दक्षिण कोरिया |
1560 |
पाकिस्तान |
1281 |
सर्वात जास्त रणगाडे असलेला देश
देश |
रणगाडे |
रशिया |
20300 |
चीन |
7716 |
अमेरिका |
5884 |
उत्तर कोरिया |
5243 |
इजिप्त |
4946 |
भारत |
4426 |
पाकिस्तान |
2182 |
सर्वात जास्त युद्धपोत असणारा देश
देश |
युद्धपोत |
उत्तर कोरिया |
967 |
चीन |
714 |
अमेरिका |
415 |
इराण |
398 |
रशिया |
352 |
भारत |
295 |
पाकिस्तान |
197 |
संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करणारा देश
देश |
संरक्षण बजेट |
अमेरिका |
44 लाख कोटी रुपये |
चीन |
10 लाख कोटी रुपये |
सौदी अरब |
4 लाख कोटी रुपये |
यूके |
3.4 लाख कोटी रुपये |
भारत |
3.2 लाख कोटी रुपये |
पाकिस्तान |
48 हजार कोटी रुपये |
आकारमानाने सर्वात मोठा देश
देश |
जल-थल-आकाशाचे क्षेत्रफळ |
रशिया |
1.7 कोटी किमी |
कॅनाडा |
99 लाख किमी |
अमेरिका |
98 लाख किमी |
चीन |
95 लाख किमी |
ब्राझील |
85 लाख किमी |
भारत |
32 लाख किमी |
पाकिस्तान |
7 लाख किमी |
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित इन्फोग्राफिक्स...