आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेबाइल चाेरट्यांमुळे तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू; वारसांना ८ लाखांची भरपाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वर्षभरापूर्वी सचखंड एक्स्प्रेसने अाैरंगाबाद ते ग्वालियर दरम्यान प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा माेबाइल चाेरट्यांपासून बचाव करताना रेल्वेतून खाली पडून जागीच मृत्यू झाला हाेता. ही घटना जळगाव रेल्वेस्थानक साेडल्यानंतर घडली हाेती. या प्रकरणी मृत तरुणांच्या वारसांना रेल्वेने ८ रु. लाखांची भरपाई द्यावी, असे अादेश देण्यात अाले अाहेत.


अाैरंगाबाद शहरातील अंगुरीबाग येथील रहिवासी असलेला नरेशकुमार चंद्रप्रकाश जैस्वाल (वय २२) हा तरुण ५ मार्च २०१७ राेजी सचखंड एक्स्प्रेसने ग्वालियर येथे जात हाेता. ताे रेल्वे डब्याच्या गेटजवळच उभा हाेता. रेल्वेने जळगाव स्थानक साेडल्यानंतर रेल्वेच्या बाहेरून दाेन तरुणांनी त्याच्या हातातील माेबाइल हिसकावण्यासाठी जैस्वाल याच्या हातावर काठी मारली. या वेळी माेबाइल वाचवण्याच्या नादात नरेश जैस्वाल गाडीतून खाली पडून रेल्वे खाली पडला अाणि त्याचा जागीच मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी जीअारपी पाेलिसांनी दाेन अाराेपींना मुद्देमालासह अटक केली हाेती. त्यांच्याविरुद्ध भादंवि ३०४(अ) ९४ सह ३४ व भारतीय रेल्वे अधिनियम १५२ नुसार भुसावळ रेल्वे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता.


या प्रकरणी मृत नरेश जैस्वालचे वडील चंद्रप्रकाश सुरेशमल जैस्वाल यांनी रेल्वे प्रशासन व भारत सरकार यांच्याविरुद्ध नागपूर रेल दवा प्राधिकरण यांच्या काेर्टात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला हाेता. या दाव्याची सुनवाणी ३ अाॅक्टाेबर २०१७ ते १७ सप्टेंबर २०१८ दरम्यान झाली. यात 'रेल्वे क्लेम ट्रायबुनल'च्या (तांत्रिक) अलका मेहरा यांनी न्याय निवडा करून या घटनेला अनपेक्षित घटना या सदराखाली वर्ग केली. सुरुवातीच्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंत प्रवाशाला सुरक्षा देण्याचे जबाबदारी रेल्वेची असल्याचे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...