आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी, गारपीटग्रस्तांना देणार भरपाई; राज्यात १२९ गावांत एकूण २,८२० हेक्टरला फटका

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे या विभागांत अवकाळी पाऊस झाला असून जळगाव, बीड, अहमदनगर, सोलापूर, बुलडाणा या जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. अवकाळीच्या नुकसानीला केंद्र सरकार मदत करत नाही, मात्र गारपिटीला केंद्र मदत देेते. पण राज्य सरकार सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यानंतर मदत जाहीर करेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. गारपीट व अवकाळीने एकूण १२९ गावांतील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने १,९७८ हेक्टर, तर गारपिटीने ४८२ हेक्टर पिकाचे नुकसान झाले. राज्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र एकूण २,८२० हेक्टर आहे. वेधशाळेचा इशारा : मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता 

मार्चच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा-विदर्भात काही ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.  पुणे वेधशाळेनुसार, विदर्भात ५-६ मार्चला काही जागी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.चक्राकार स्थितीमुळे पाऊस :


पूर्व-पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम, मध्य प्रदेश व कर्नाटक किनाऱ्याजवळील चक्राकार वाऱ्यांची स्थिती, या दोन चक्राकार स्थितीदरम्यान असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस-गारपीट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...