आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रानावतविरोधात मुंबई पोलिसांनी बजावला समन्‍स, प्रॉपर्टी डीलरने केली तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्‍ट्रेस कंगना रानावतविरोधात मुंबई पोलिसांनी समन्‍स बजावले आहे.  मुंबईतील प्रॉपर्टी डीलरने कंगनाविरोधात तक्रार दिली आहे. प्रॉपर्टी डीलरने कंगनासह तिची बहिण आणि कंगनाच्‍या ऑफिस स्‍टाफविरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे. कंगनाला घर मिळवून देऊनही कंगनाने ब्रोकरेज (कमीशन) दिला नाही, असा आरोप डीलरने कंगनावर लावला आहे. 

 

कंगनाने फेटाळून लावले आरोप
कंगनाने आपल्‍यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तिने म्‍हटले आहे की, आपल्‍या फायनान्‍स टीमने ठरवल्‍यानूसार डीलरला एक टक्‍का कमीशन म्‍हणजे जवळपास 20 लाख रूपये दिले आहेत. मात्र तो आता 2 टक्‍के कमीशन मागत आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...