आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मेटेंविरोधात पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची तांडेल यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना शिवस्मारक प्रकल्पाचे अध्यक्ष व शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा हलगर्जीपणा एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, अशी तक्रार अखिल भारतीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी शुक्रवारी कुलाबा पोलिसांत करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  

 
बुधवारी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीस जाताना स्पीड बाेट उलटून त्यात शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्यास कार्यक्रमाचे आयोजक व प्रकल्पाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे हे पूर्णपणे जबाबदार आहेत, असा तक्रारदार तांडेल यांचा आरोप आहे.   या कार्यक्रमासाठी दोन बोटींना परवानगीच असताना प्रत्यक्षात पाच बोटी कार्यक्रमासाठी नेल्या. स्पीड बोटीत १२ प्रवासी क्षमता असताना २० कार्यकर्ते बसवले. बोटीत पुरेशी लाइफ जॅकेट, लाइफ रिंग्ज  नव्हत्या, असे तांडेल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दुर्घटनाग्रस्त झालेली स्पीड बोट ८० नाॅटिकल वेगाने जात होती.

 

या बोटीने खडकाळ भागातून चुकीचा मार्ग निवडला. त्यामुळेच बाेट दुर्घटनाग्रस्त झाली. या अक्ष्यम हलगर्जीपणासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल करावा, असे   दामोदर तांडेल यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...