Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Complaint filed a minor Girl marrying issue in Aurangabad

बाप नव्हे साप..! आई नसलेल्या 13 वर्षीय मुलीचे लग्न लावले तिप्पट वयाच्या पुरुषासोबत, दामिनी पथकाने दिला आधार

प्रतिनिधी | Update - Jan 15, 2019, 12:10 AM IST

तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असताना दुर्धर आजाराने आईचे निधन झाले. त्यानंतर वडिलांना दारुचे व्यसन..

 • Complaint filed a minor Girl marrying issue in Aurangabad

  औरंगाबाद- इयत्ता तिसरीमध्ये शिकत असताना आईचे दुर्धर आजाराने निधन झाले. त्यानंतर आहे त्या हालाखीच्या परिस्थितीत आयुष्य काढत असताना दारुड्या बापाने तेराव्या वर्षी थेट 40 वर्षांच्या पुरुषासोबत लग्न लावून दिले. परंतु, तिकडे देखील सुरू झालेला छळ आणि वयाने तिप्पट मोठ्या असलेल्या नवऱ्यापासून सुटका करून मुलगी वडिलांकडे परत आली. परंतु, सासरी जाण्यासाठी दारुडा बाप मारहाण करत असल्याने तिने घर सोडून थेट घाटी पोलिस चौकी गाठत मदतीचा हात मागितला. त्यानंतर पोलिसांनी तिला दामिनी पथकाकडे सुपूर्द केले. शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला.

  शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घाटी पोलिस चौकीत सोळा वर्षाची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दाखल झाली. बसस्थानक, रेल्वेस्थानक कुठे आहे, कसे जातात असे तिने पोलिसांना विचारले. रात्रीच्या वेळी घाबरलेल्या अवस्थेत पोलिस चौकीत आलेली मुलगीला काही तरी त्रास असल्याने पोलिसांनी तिला बसवत धीर दिला.

  त्या नंतर तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली व तिचा विश्वास संपादन केला. तेव्हा मुलीने दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून पळून आल्याचे सांगितले. घाटी चौकीतील पोलिसांनी तिची परिस्थिती समजून घेत घाटीतील महिला कक्षात सकाळपर्यंत थांबवले. सकाळी पोलिसांनी तिला पुन्हा चौकीत आणले व दामिनी पथकाला याबद्दल माहिती दिली. दामिनी पथकाने तिची चौकशी करत तिला घरी जाण्यास सांगितले. परंतु, तिने वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने सेजल आधार निकेतनमध्ये दाखल करण्यात आले.

  आईचा मृत्यू, तिप्पट मोठ्या पुरुषासोबत लग्न
  दामिनी पथकाला मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असताना दुर्धर आजाराने आईचे निधन झाले. त्यानंतर वडिलांना दारुचे व्यसन होते. माझ्या संगोपनापासून सुटका करण्यासाठी त्यांनी दोन वर्षापूर्वी मोठ्या वयाच्या मुलांच्या वडीलांशी माझे लग्न लावून दिले असल्याचे सांगताचा पोलिसांनाही धक्का बसला. आठवीत शिकत असतानाच 40 वर्षांपेचा अधिक मोठ्या पुरुषासोबत तिचे बळजबरी लग्न लावून दिले.

  पतीच्या छळास कंटाळून बापाचे गाठले घर, मात्र तेथेही त्रासच
  स्वतःची त्या कुटूंबातून सुटका करत तिने पुन्हा माहेर गाठले. दोन वर्षांपासून ती माहेरीच राहत होते. परंतु दारू पिऊन बाप रोज सासरी जाण्यासाठी मारहाण करत होता. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी रात्री तिने गाव सोडले आणि औरंगाबाद गाठले. पुन्हा वडील आणि सासरी न जाण्याचा निर्णय तिने बोलून दाखवला. वरिष्ठांशी चर्चा करून दामिनी पथकाने तिला सेजल आधार निकेतनमध्ये दाखल केले आहे.

Trending