आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Complaint Filed Against Ravina Tandon, Farah Khan, Bharti Singh In Beed, Complainer Said, They Hurt Our Religious Feelings On TV Show

अभिनेत्री फराह खान, भारती सिंह, रविना टंडनविरुद्ध बीडमध्ये गुन्हा, टीव्ही शोमध्ये दुखावल्या धार्मिक भावना

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बीड : एका टीव्ही शोमध्ये ख्रिश्चन धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांच्याविरुद्ध बीडमध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आशिष शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली. एका विनोदी टीव्ही शोमध्ये या तिघींनी ख्रिश्चन बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या एका शब्दाबाबत अश्लील टिप्पणी केल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी अर्जात केला आहे. यासाठी तक्रार अर्जासोबत त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ, सीडीही पोलिसांना दिली गेली होती. याबाबत पोलिसांनी खात्री केल्यानंतर धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी फराह खान, रविना टंडन आणि भारती सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.