आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-कॉमर्स कंपनी Snapdealच्या संस्थापकांविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल; बोगस सामान पाठवल्याचा केला आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा (राजस्थान) - ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बंसल यांच्याविरोधात कोटाच्या गुमानपुरा पोलिस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदरा इंदरमोहन सिंह हनी यांनी स्नॅपडीलवरून वुडलँड कंपनीचा बेल्ट आणि वॉलेट (पाकीट) मागवले होते. पण कंपनीने त्यांना बोगस सामान पाठवले. न्यूज एजन्सीने गुरुवारी ही माहिती दिली.

 

वुडलँडच्या स्टाफने प्रॉडक्ट नकली असल्याची पुष्टी केली

पोलिसांच्या मते, इंदरमोहन सिंहने 17 जुलै रोजी हे प्रॉडक्ट मागविले होते. त्याचे पेमेंट ऑनलाइन केले होते. डिलीवरी मिळाल्यानंतर प्रॉडक्टच्या क्वॉलिटीवर संशय आल्यानंतर वुडलँडच्या शोरूममध्ये त्याची तपासणी केली. तेथील स्टाफने त्या दोन्ही वस्तू नकली असल्याचे सांगितले. 

 

यापूर्वीही आला होता स्नॅपडीलचा वाईट अनुभव

या प्रकरमात स्नॅपडीलचे सीईओ कुणाल बहल आणि रोहित बंसल यांच्याविरोधात तपास करण्यासाठी एक सहायक पोलिस निरीक्षकाला नियुक्त करण्यात आले आहे. तक्रारदाराचे सांगितले, की यापूर्वीही स्नॅपडीलसोबत त्यांचा अनुभव वाईट होता. काही महिन्यांपूर्वी स्नॅपडीलवरून घड्याळ मागवले होते. पण त्याची डिलीवरी मिळाली नव्हती आणि प्रॉडक्ट पोहोचल्याचा मेसेच त्यांना मिळाला होता. पण नंतर तक्रार केल्यानंतर त्यांना रिफंड मिळाला होता.