आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाणी कपूरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल,  या कारणामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने 11 नोव्हेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिने तंग कपडे घातले होते. तिने परिधान केलेल्या कपड्यांवर ‘हे राम’ नावाची प्रिंट होती. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाणीविरोधात मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप....
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये रमा सावंत नावाच्या एका महिलेने वाणीविरोधात तक्रार दाखल केली. वाणीने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिने केला आहे. या तक्रारीनंतर वाणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर वाणीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. 

वाणीने हटवला फोटो... 
'हे राम' नावाची प्रिंट घातल्यानंतर वाणी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. त्यामुळे तिने हा फोटो डिलीटदेखील केला होता. मात्र काही नेटकऱ्यांनी पुन्हा तिचा फोटो शेअर केला. अनेकांनी धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत तिला खडे बोल सुनावले होते.

बातम्या आणखी आहेत...