आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. आता याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलिसांत भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकाच्या लेखक, प्रकाशक तसेच विमोचकावर तातडीने कारवाई करावी. तसेच यावर बंदी घालावी अशी मागणी करत नागपूरमधील नंदनवन पोलिस ठाण्यात करण्यात आली. तसुच औरंगाबादमधील एन-7 सिडको पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही जय भगवान गोयलविरोधात भावना दुखावल्याची तक्रार करत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यावा- संजय राऊत
शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत चांगले तापले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचे वशंजांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, "सातारा, कोल्हापूरमधील राजे हे सर्व भाजपमध्ये आहेत. भाजपचे खासदार,आमदार आहेत. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा देशाला आदर आहे. मात्र मोदींची छत्रपतींशी तुलना हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या वादानंतर महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यायला हवे होते," असे राऊत म्हणाले.
महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी नाही- अशोक चव्हाण
"छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही," असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि इतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.