आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री स्वरा भास्करविरुद्ध देशद्रोहाची तक्रार दाखल, भडकाऊ भाषण देऊन वातावरण खराब केल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

​​​​एंटरटेन्मेंट डेस्क : चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली गेली आहे. कानपुरचे वरिष्ठ वकील विजय बख्शी यांनी अभिनेत्री स्वरा भास्करविरुद्ध भडकाऊ भाषण देणे आणि वातावरण खराब केल्याचा आरोप करत कानपुरच्या सीएमएम सप्तम यांच्या कोर्टात तक्रार दाखल केली आहे. विजय बख्शी यांनी यूट्यूबवर अभिनेत्री स्वरा भास्करच्या व्हिडिओचा आधार घेतला आहे. फिर्यादीने स्वरा भास्करविरुद्ध आयपीसीच्या कलम 124 ए, 153 ए, 153 बी आणि 505 (2) अंतर्गत खटला दाखल करण्याची मागणी केली आहे

फिर्यादी (वकील) विजय बख्शी यांच्यानुसार, अभिनेत्री स्वरा भास्कर भारत सरकारला अस्थिर करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्यासाठी यूट्यूबवर भडकाऊ भाषण देत आहे. त्याचा मी एक व्हिडिओ पाहिला होता, त्यानंतरच दिल्लीमध्ये दंगल झाली आहे. एक कॉन्स्टेबल रतन लाल आणि आयबीच्या अंकित शर्माचा मृत्यू झाला. त्यामुळे मी स्वरा भास्करविरुद्ध देशद्रोहाची याचिका दाखल केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...