आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या त्या व्यक्तीचा झाला होता खून; जमिनीच्या वादातून मुलीनेच वडिलांना संपवल्याचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- तालुक्यातील कापूसवाडगाव येथील शेतवस्तीवरील बिबट्याच्या हल्ल्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या त्या व्यक्तीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. मंगळवारी या प्रकरणात मृताच्या मुलीने वडिलांसोबत राहत असलेली हौसाबाई ही महिला जमीन नावावर करून द्यावी यासाठी त्यांच्याशी सतत वाद करत होती. त्यामुळे त्या महिलेनेच वडिलांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. वीरगाव पोलिसांनी मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. यात हौसाबाईला संशयित आरोपी केले आहे. 

 

सोमवारी कापूसवाडगाव शिवारात भीमाशंकर गिरी (५७) हे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांचा चेहरा विद्रूप करून हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा देखावा प्रथमदर्शनी करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत पावले असल्याची बाब समोर आली होती. 

बातम्या आणखी आहेत...