आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Complaint : Trollar Had Given Threat To Raping Anurag Kashyap's Daughter, He Filed FIR Against Troller

तक्रार : ट्रोलरने दिली होती मुलीच्या रेपची धमकी, अनुराग कश्यपने दाखल केली एफआयआर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : डायरेक्टर अनुराग कश्यपने मुलीच्या रेपची धमकी देणाऱ्या ट्रोलरविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याने अंबोली पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केली. झाले असे की, ट्रोलरने ट्विटरवर अनुरागची 18 वर्षांची मुलगी आलियाचा रेप करण्याची धमकी दिली होती त्यानंतर डायरेक्टरने आयटी एक्टनुसार, तक्रार दाखल केली. त्याने स्वतः ट्वीट करून एफआयआर दाखल केली असल्याचे सांगितले. 

 

 

ट्विटरवर मिळाली होती अनुरागला धमकी... 
लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपीला मिळालेल्या विजयानंतर अनुरागने पीएम नरेंद्र मोदीला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा संदेशासोबतच त्याने मोदी यांना हा प्रश्न विचारला आम्ही त्या भक्तांना कसे हॅण्डल करावे जे मोदींची प्रशंसा न केल्यामुळे त्यांच्या मुलीवर रेप करण्याची धमकी देतात.  

 

अनुरागचे पीएमला शुभेच्छाचे ट्वीट... 

 

 

अनुरागच्या या ट्वीटनंतर लेखिका सुचित्रा कृष्णमूर्तिने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. सुचित्राने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, 'मोदी सरकार समर्थक असूनही मला रेपची धमकी दिली गेली होती. मी या प्रकरणात पोलिसांची मदत घेतली आणि सायबर क्राइम सेलने माझी पूर्ण मदत केली.'

 

 

अनुरागच्या या ट्वीटवर इतरही अनेक लोकांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनतर त्याने पोलिसांची मदत घेतली. डायरेक्टरने ट्विटरवर मिळालेल्या तक्रारीच्या सल्ला देणाऱ्या फॅन्सला धन्यवाद म्हणले.  
 

बातम्या आणखी आहेत...