आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळचा महाराष्ट्रातील आहे JNU नेता उमर खालीद, देशविरोधी घोषणांमुळे आला होता चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर नवी दिल्लीत गोळीबार झाला आहे. जेएनयूमधील आंदोलनानंतर उमर खालीद प्रकाश झोतात आला होता. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणांच्या वादामध्ये प्रमुख नाव होते ते उमर खालीदचे. यासह इतरही अनेक वादांत उमरचे नाव समोर येत राहिले आहे. दिल्लीतील राजकारणात चर्चेत राहणारा हा उमरा मूळचा महाराष्ट्रातील आहे. उमर खालिद याच्याविषयीची अशीच काही माहिती आम्ही आज घेऊन आलो आहोत.


वादांमध्ये नाव...
- दिल्लीतील जेएनयू वादात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले नाव म्हणजे उमर खालिद.
- जेएनयूमधील काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, उमर खालिदने सहका-यांसह कॅम्पसमध्ये हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह फोटो व द्वेष पसरविणारे संदेश लावले, पसरवले होते.
- संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरूच्या स्मरणार्थ एका समांरभाचे आयोजन केले होते. त्यात उमर खालिद सहभागी झाला होता.
- यासोबतच उमर खालिद स्वतंत्र काश्मीरचा देश बनविला पाहिजे असे म्हणणे जेएनयू कॅम्पसमध्ये मागणी करत होता.
- 2010 मध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सीआरपीएच्या जवानांची हत्या केल्यानंतर उमर खालीदसह अनेकांनी जल्लोष केला होता. याबाबत दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाला रिपोर्ट दिला होता.
- 26 जानेवारी 2015 रोजी इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये कश्मीरला वेगळा देश दाखवत त्याने फूड स्टॉल लावला होता.
- नवरात्रीच्या काळात देवी दुर्गेचा अवमान करणारे संदेश पाठवत महिषासुराला महिमापंडित म्हणून त्याचा पुण्यदिन साजरा केला होता.


देशविरोधी घोषणांमुळे चर्चेत
-‘तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा’ ‘भारत की बर्बादी तक जंग रहेगी...’ ‘कश्मीर की आजादी तक जंग रहेगी...’ ‘अफजल के अरमानों को मंजिल तक ले जाएंगे...’ ‘बंदूक के बल पर... आजादी...’ ‘ अफजल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं....’ अशा नारे दिल्याने 2015 साली उमर खालिद देशभर चर्चेत आला.
- मात्र, यावर उमर खालिद व त्याच्या समर्थकांचे म्हणणे वेगळे आहे. विशेष म्हणजे या नारेबाजीच्या प्रकरणात त्याचा सहकारी कन्हैया कुमारला सरकारने तुरूंगात डांबले होते.
- खालिद व त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, आम्ही कधीही भारताविरोधात नारे दिले नाहीत. जे व्हिडिओ समोर आणले आहेत त्याच्याशी छेडछाड केली आहे. यात काही टीव्ही वाहिन्यांचाही हात आहे.
- उमर म्हणतो, होय माझे नाव जरूर उमर खालिद आहे पण मी दहशतवादी नाही. काही लोक माझ्या धर्माचा व नावाचा उल्लेख करून एका समुदायाला लक्ष करत आहेत.


दबलेल्यांचा आवाज उठवतच राहणार
- होय, आम्ही सर्वसामान्य, गरीब, शोषित, दलित यांच्याबाबत आवाज उठविला आहे व भविष्यातही उठवत राहू पण आम्ही देशविरोधी नाही व देशविरोधी कृत्यांना साथ देत नाही की त्यांचे समर्थन करत नाही.
- खालिदचे म्हणणे आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेत जे जे म्हटले आहे त्याचबाबत बोलत आहोत, आवाज उठवत आहोत.
- मूलभूत अधिकाराबाबत मग धर्मस्वातंत्र्य, असो की आहार, आचार, पोशाष ते विचार काहीही असो त्याचे संरक्षण आम्हाला घटनेने दिले आहे. मात्र, काही लोकांचा याला विरोध आहे. अशा प्रवृत्तींना आम्ही विरोध करतच राहणार.


कोण आहे उमर खालिद?
- उमर खालिद मूळचा महाराष्ट्रातील आहे. विदर्भातील अमरावतीमधील तालेगाव हे त्याचे मूळ गाव आहे.
- तीस वर्षापूर्वी उमर खालिदचे वडिल दिल्लीत स्थायिक झाले आता ते दिल्लीतील जाकिरनगर परिसरात राहतात.
- मात्र, उमर खालिद जाकिरनगर परिसरात फारसा दिसत नाही राहत नाही.
- उमर खालिदचे वडिल सय्यद कासिम रसूल इलियास हे दिल्लीत ऊर्दू भाषेतील मॅगझीन 'अफकार-ए-मिल्ली' चालवतात.
- उमर खालिद सध्या जेएनयूमधील स्कूल ऑफ सोशल सायन्स विभागात इतिहास विषयात पी. एचडी करत आहे.
- त्याआधी उमरने जेएनयूमधून इतिहासात एमए आणि एमफिल केले आहे.
- उमर सध्या जेएनयूमधील ताप्ती विद्यार्थी वसतीगृहातील खोली क्रमांक 168 मध्ये राहतो.
- त्याच्या वसतीगृहात राहण्याबाबत दोन मतमतांतरे आहेत. नियमानुसार ज्यांचे दिल्लीत निवास आहे त्यांना वसतीगृहातील प्रवेशाबाबत प्रायोरिटी दिली जात नाही. 
- देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांची राहण्याची सोय झाल्यानंतर शिल्लक जागा राहिल्यानंतर दिल्लीत राहणा-या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश दिला जातो. 
- मात्र, बाहेरील राज्यांतील व शहरांतील काही विद्यार्थ्यांना जेएनयूमधील वसतीगृहात प्रवेश न मिळाल्याने ते बाहेर राहत आहेत तर खालिदला प्रवेश दिला गेल्याचे त्याच्या विरोधकांचे म्हणणे आहे.
- उमर खालिद जेएनयूमध्ये ज्या संघटनेशी जोडला आहे त्या डीएसयूबाबत सीपीआय माओवादी समर्थक विद्यार्थी संघटना मानली जाते. त्यामुळे उजव्या विचारसारणीचे लोक या संघटनेला कायमच विरोध करत आले आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...