आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश प्राप्तीसाठी संपूर्ण माहिती असणे आवश्यक, कारण अपूर्ण ज्ञान सर्वकाही नष्ट करू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांनाच माहिती आहे की, कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे. परंतु कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान नसेल तर ते काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकत नाही. 'संपूर्ण ज्ञान नसणे म्हणजे अपूर्ण ज्ञान'. जर आपल्याला एखाद्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करावयाची असेल तर त्यासंबंधित सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. काम कशाप्रकारे करावयाचे आहे हे माहित नसल्यास त्यामध्ये अपयश पदरी पडण्याची शक्यता जास्त राहते. येथे जाणून घ्या महाभारतातील एक प्रसंग, ज्यावरून अपूर्ण ज्ञान किती घातक ठरू शकते हे लक्षात येईल....

जेव्हा अश्वत्थामाने चालवले ब्रह्मास्त्र -
महाभारतातील युद्धामध्ये दुर्योधनाने मृत्युपूर्वी अश्वत्थामाला कौरवांच्या सेनापती पदावर नियुक्त केले होते. त्याने पांडवाचे पाचही पुत्र, धृष्टद्युम्न, शिखंडी सहित इतर वीरांना मारून टाकले. एवढा संहार करूनही त्याचा राग शांत झाला नाही. अर्जुनाने देखील अश्वत्थामाचा वध करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले.

दोघांचेही गुरु द्रोणाचार्य होते. सर्व शस्त्र विद्येमध्ये दोघेही पारंगत होते. दोघांमधील युद्ध वाढतच चालले होते. अश्वत्थामाने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडले. प्रत्युत्तरामध्ये अर्जुनानेही अश्वथामावर ब्रह्मास्त्र सोडले. दोन्ही अस्त्रांनी पृथ्वीचा विनाश झाला असता.

हे पाहून, वेद व्यास युद्धामध्ये पडले आणि त्यांनी दोघांचे ब्रह्मास्त्र थांबवले. अर्जुन आणि अश्वत्थामा दोघांनाही त्यांनी खूप समजावून सांगितले. दोघांनाही शस्त्र परत घेण्यास सांगितले, अर्जुनाने व्यास मुनींचा मान ठेवून लगेच ब्रह्मास्त्र परत घेतले परंतु अश्वथामाने घेतले नाही. वेद व्यासांनी जेव्हा अश्वथामाला तू शस्त्र परत का घेत नाहीस हे विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले की मला ब्रह्मास्त्र परत बोलावण्याच्या विद्येचे ज्ञान नाही.

हे ऐकून वेदव्यास क्रोधीत झाले आणि म्हाणाले की, ज्या विद्येचे पूर्ण ज्ञान नाही त्या विद्येचा तू उपयोग का केलास. संपूर्ण सृष्टीसाठी हे घातक ठरले असते. त्यानंतर त्यांनी अश्वथामाला शाप दिला.

तात्पर्य - विद्या कोणतीही असली तरी आपल्याला त्याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्या ग्रहण करण्यात हलगर्जीपणा केला तर त्याचे घातक परिणाम भविष्यात भोगावे लागतात.