आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधपणे आणि अत्यंत कठीण प्रक्रियेमधून निवडले जातात देशाच्या 12 लाख जवानांचे 'BOSS'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवाणे यांना ईस्टर्न कमांडची जबाबदारी मिळाल्याने पुन्हा एकदा नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यांनुसार या हालचालीमुळे लेफ्टनंट जनरल नरवाणे आर्मी चीफ बनण्याच्या स्पर्धेत आले आहेत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी सांगितले की, आर्मी चीफना  ऑपरेशन एक्सपिरियन्स असायलाच हवे हे गरजेचे नाही. आर्मी ट्रेनिंग कमांडद्वारेही थेट आर्मी चीफ नियुक्त करता येतात आणि यापूर्वी असे झालेले आहे. 


साधारणपणे आर्मी चीफची नियुक्ती करताना सिनियारीटी लक्षात घेतली जाते. विद्यमान लष्करप्रमुख बिपिन रावत पुढच्या वर्षी निवृत्त होतील. याच सर्व चर्चांदरम्यान आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत लष्करप्रमुखांची नियुक्ती नेमकी कशी आणि केव्हा होते. 


इंडियन आर्मी ही इंडियन आर्म्ड फोर्सेसच्या पाठिच्या कण्याप्रमाणे आहे. आर्मीचे सैनिक अत्यंत विपरित परिस्थितींमध्ये सीमेचे संरक्षण करतात. भारतीय आर्मीचे सैनिक 35 डिव्हीजन आणि 13 कॉर्प्समध्ये विभागलेले आहेत. सक्रिय जवानांचा विचार करता इंडियन आर्मी जगातील दुसरी सर्वात मोठी आर्मी आहे. सध्या इंडियन आर्मीमध्ये 12 लाखांहून अधिक सक्रिय सैनिक आहेत. 


कोणाला आहे निवडीचा अधिकार 
भारत सरकार आर्मी चीफची नियुक्ती करते. नियुक्ती करताना सिक्युरिटी सिच्युएशनसह इतर गोष्टींचाही विचार केला होता. वरिष्ठतेचीही यात महत्त्वाची भूमिका असते. 


नियुक्तीची जबाबदारी कोणाची 
नियुक्तीचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाची 'अपॉइंटमेंट्स कमेटी ऑफ द कॅबिनेट' (ACC) घेते. या कमिटीमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांचा समावेश असतो. 


कशी असते सिलेक्शन प्रोसेस 
- याची प्रक्रिया नियुक्तीच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी सुरू होत असते. 
- संरक्षण मंत्रालय पर्सनल डाटाबरोबरच प्रोफेशनल प्रोफाइलची सर्चिंग सुरू करत असते. 
- एलिजिबिलिटी पूर्ण करणारे लेफ्टिनंट जनरल, व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वेगवेगळ्या कमांडचे चीफ, यांच्या प्रोफाइलचे सर्चिंगही केले जाते. 
- त्यानंतर एलिजिबल कँडिडेट्सचे पर्सनल एक्सपोडर, अचिव्हमेंट्स, ऑपरेशनल एक्सपिरियन्स पुढे फॉरवर्ड केला जातो. 
- मिनिस्ट्री त्याला ACC कडे फॉरवर्ड करते. 


किती दिवस असतात पदावर
चीफ ऑफ आर्मी स्टाफचा कार्यकाळ 3 वर्षे किंवा वयाच्या 62 वर्षांपर्यंत असतो. यापैकी जे आधी पूर्ण होईल, त्याचवेळी सेवा समाप्त होतात. 

बातम्या आणखी आहेत...