आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी अडवले तेव्हा राजीव गांधींनीच नलिनीला बोलावले जवळ, असा होता हत्येचा कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजीव गांधीच्या हत्येच्या काही क्षणापूर्वी काढलेला फोटो. - Divya Marathi
राजीव गांधीच्या हत्येच्या काही क्षणापूर्वी काढलेला फोटो.

नवी दिल्ली - देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. 21 मे 1991 रोजी श्रीपेरम्बदुर येथे मानवी बॉम्बने स्फोट घडवून राजीवजींची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा नियोजनबद्ध कट रचला होता लिट्टे प्रमुख प्रभाकरण याने. आत्मघातकी बॉम्बद्वारे त्यांची हत्या घडवण्यात आली होती. 


1984 मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठे यश मिळाले होते. मात्र, 1989 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर राजीव गांधी यांच्यावर काँग्रेसमधूनच मोठी टीका झाली होती. त्यातून त्यांनी नवी रणनीती तयार केली आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करु लगाले. 1991 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारावेळी तर ते सुरक्षा रक्षकांचे कडे भेदून लोकांमध्ये मिसळत होते. देशभरातील प्रचार दौऱ्यात त्यांनी संरक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. संरक्षणासंबंधी त्यांना यंत्रणेकडून अनेक सुचना करण्यात आल्या, मात्र त्याकडे त्यांनी कानाडोळा केला.


श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्यापूर्वी लिट्टे प्रमुख प्रभाकरन त्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आला होता. त्यानंतर जे काही घडले त्याची पटकथा प्रभाकरनने लिहिली होती. तो फक्त संधीच्या शोधात होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना प्रभाकरन दिल्लीत आला होता. तेव्हा राजीव गांधींनी त्याच्यासोबत कडक भूमिका घेतली होती. तो ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता त्याला तिथेच नजरकैद करण्यात आले होते. प्रभाकरनने तामिळींच्या हितासाठी राजीव गांधीच्या अटी मान्य करण्यास नकार दिला होता. जोपर्यंत अटी मान्य करत नाही, तोपर्यंत त्याला हॉटेलमधून बाहेर पडता येणार नव्हते. त्यामुळे त्याने दिल्लीतून सुटका करुन घेण्यासाटी अटी मान्य असल्याचा बनाव केला आणि श्रीलंकेला परतला. या घटनेनंतर तो राजीव गांधींचा कट्टर शत्रू बनला.


जाफनात झाली होती बैठक
1990 च्या नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेच्या जाफनामधील घनदाट जंगालात लिट्टेची एक गोपनीय बैठक झाली होती. या बैठकीला प्रभाकरन, बेबी सुब्रम्हण्यम, मुथुराजा, मुरुगन आणि शिवरासन उपस्थित होते. बैठकीचा अजेंडा होता, राजीव गांधींची हत्या कशी करायची. त्यासाठी अनेक प्लॅन तयार करण्यात आले. अखेर एका प्लॅनवर सर्वांचे एकमत झाले आणि कोण कोणती भूमिका निभावेल हे ठरले. त्यानंतर बेबी आणि मुथुराजा 1991 च्या सुरुवातीला चेन्नईमध्ये आले होते.
 
अशापद्धतीने लावला ट्रॅप
बेबी आणि मुथुराज चेन्नईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी शुभा न्यूज फोटो एजंसीचे मालक शुभा सुब्रह्मण्यमची भेट घेतली. प्रभाकरनने त्याच्याकडे आधीच संदेश पाठवला होता, की या दोघांची मदत करायची आहे. त्यांनी रचलेल्या षडयंत्रानुसार, बेबीला न्यूज एजंसीमध्ये काम देण्यात आले. तिने तेथील भाग्यनाथनला आपल्या जाळ्यात फसवले. राजीव गांधींच्या हत्येच्या आरोपात शिक्षा भोगत असलेली नलिनी ही याच भाग्यनाथनची बहिण आहे. तेव्हा ती प्रेसमध्ये काम करत होती.
 
कोण होते फोटोग्राफर
शुभा न्यूज एजंसीमध्ये रविशंकरन आणि हरिबाबू हे दोन फोटोग्राफर होते. बेबी आणि मुथुराज आल्यानंतर त्यातील हरिबाबूला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. मुतुराजने हरिबाबूला विज्ञानेश्वर एजंसीमध्ये नोकरी मिळवून दिली. तेथे हरिबाबूला खूप पैसे मिळू लागले आणि त्याचा ओढा मुथुराजकडे वाढू लागला. त्यानेच हरिबाबूला राजीव गांधींविरोधात भडकवले. तो म्हणत होता, जर 1991 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले आणि ते सत्तेवर आले तर तामिळींची अधिक अधोगती होईल. त्याचवेळी श्रीलंकेत असलेला मुरुगन याने जय कुमारन आणि रॉबर्ट पायस यांना चेन्नईत पाठवले. जयकुमारचा मेव्हणा अरीवेयू पेरुलीबालन लिट्टेचा बॉम्ब एक्सपर्ट होता. तो 1990 पासून लपून बसलेला होता. पोरूर येथील त्याचे घरच राजीव गांधींच्या हत्येचा प्लॅन तयार करण्याचे हेडकॉर्टर बनले होते.
 

प्रभाकरनला सांगितले मानवी बॉम्ब सापडत नाही
शिवरासन पोरुरला पोहोचताक्षणीच जाफनाच्या जंगलात षडयंत्र पूर्ण झाले होते. शिवरासनने पूर्ण योजना आपल्या ताब्यात घेतली. बेबी आणि मुथुराज श्रीलंकेला परत गेले. चेन्नईमध्ये नलिनी, मुरुगन आणि भाग्यनाथन यांच्यासोबत शिवरासन मानवी बॉम्बचा शोध घेऊ लागला, पण त्याला हवी तशी व्यक्ती मिळाली नाही. त्याने अरीवेयूचे बॉम्ब डिझाइन चेक केले. त्यानंतर समुद्री मार्गाने तो पून्हा जाफनाला गेला आणि तिथे प्रभाकरनची भेट घेतली. त्याने प्रभाकरनला स्पष्ट केले, की भारतात मानवी बॉम्ब सापडत नाही. प्रभाकरनने शिवरासनच्या चुलत बहिणी धनू आणि शुभाला त्याच्यासोबत भारतात पाठवले. धनू आणि शुभाला घेऊन शिवरासन एप्रिलमध्ये चेन्नईत आला. शिवरासनने पायस, जयकुमारन आणि बॉम्ब डिझायनर अरीवेयू यांच्यापासून स्वतःला वेगळे ठेवले. तो पोरूर येथे राहू लागला. चेन्नईमध्ये तीन ठिकाणी राजीव गांधी यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात होते. शिवरासनने टार्गेटचा खुलासा न करता बॉम्ब एक्सपर्ट अरीवेयूकडून एक असे डिझाइन तयार करुन घेतले जे महिलेच्या कमरेला बांधता येईल.


आरडीएक्स आणि 9 एमएमची बॅटरी
शिवरासनच्या सांगण्यावरुन अरीवेयूने एक असा बेल्ट तयार केला ज्यात सहा आरडीएक्स ठेवता येतील. प्रत्येक ग्रेनेडमध्ये 80 ग्रॅम सीफोर आरडीएक्स ठेवण्यात आले. सगळे ग्रेनेड एका चांदीच्या तारेने जोडण्यात आले. बॉम्ब चार्ज करण्यासाठी 9 एमएमची बॅटरी लावण्यात आली. ग्रेनेडमध्ये जमा करण्यात आलेले स्प्रिंटर कमीत कमी स्फोटकात 5000 मीटर प्रतिसेकंद वेगाने बाहेर पडणार होते. म्हणजे प्रत्येक स्प्रिंटर एका गोळीचे काम करणार होते. बॉम्ब असा डिझाइन केला गेला होता की, आरडीएक्स कितीही कमी असले तरी स्फोट झाल्यानंतर टार्गेट वाचू शकणार नाही.
 

व्ही.पी.सिंहाच्या रॅलीत रेकी
12 मे 1991 मध्ये शिवरासन आणि धनूने माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग आणि डीएमके सुप्रिमो करुणानिधी यांच्या रॅली दरम्यान फायनल रेकी केली. तिरुवल्लूर येथील अरकोनम येथील रॅलीत धनू व्ही.पी.सिंहांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाया पडली होती.  यामुळे शिवरासनला योजना यशस्वी होण्याचा विश्वास आला होता.


राजीव गांधींनी बोलावले होते जवळ 
राजीव गांधीची प्रचारसभा 21 मे रोजी श्रीपेरम्बदूर येथे होती. 20 च्या रात्री शिवरासन नलिनीच्या घरी पोहोचला . त्याच्या हातात सभेची जाहिरात असलेला पेपर होता. तिथेच ठरले की आता 21 च्या सभेतच काम करायचे. शुभाने धनूला बेल्ट लावून तालिम केली. त्याच रात्री सर्वांनी एकत्र येऊन एक चित्रपट पाहिला आणि झोपले. दुसऱ्या दिवशी सगळे सभास्थळी पोहोचले. सभेसाठी राजीव गांधींना येण्यास उशिर होत होता. राजीव गांधी आल्यानंतर नलिनी पुढे जाण्याचा प्रयत्न करु लागली तर, एका महिला पोलिस अधिकाऱ्याने तिला मागे लोटले. मात्र राजीव गांधींनी तिला जवळ बोलावले. राजीव यांच्या जवळ गेल्यानंतर तिने त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकला आणि पायापडण्यासाठी खाली वाकली आणि स्फोट घडवून आणला.

बातम्या आणखी आहेत...