Home | Jeevan Mantra | Dharm | Complete Vidhi of laxmipujan watch the Video

लक्ष्मीपूजन : आज या मुहूर्तावर करा पूजा, ही आहे शास्त्रोक्त पद्धत.. पाहा पूजा कशी मांडावी याचा Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 10:42 AM IST

लक्ष्मीची पूजा करताना काही खास गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप आवश्यक मानले जाते.

 • भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा म्हणजे लक्ष्मीपुजनाचा (बुधवार 7 नोव्हेंबर 2018) दिवस आहे. लक्ष्मीपुजनाचा मुहूर्त सायंकाळी 06.01 वाजेपासून ते रात्री 08.33 वाजेपर्यंत आहे. या दरम्यान विधिवत लक्ष्मीपुजन करावे.

  लक्ष्मीपूजनासाठी सर्वश्रेष्ठ मुहूर्त
  लाभ सकाळी ६.५४ ते ७.५८
  अमृत सकाळी ७.५५ ते ९.३३
  शुभ सकाळी १०.१७ ते १२.१२
  चल दुपारी ३.०१ ते ४.३१
  लाभ दुपारी ४.३० ते ५.५०
  गोरज सायं. ५.४५ ते ७.३०
  शुभ सायं. ७.३० ते ९.००
  अमृत रात्री ९.०१ ते १०.३१

  'स्थिर लग्ना'नुसार मुहूर्त
  सिंह लग्न मध्यरात्री १२.५० ते २.५०

  पूजेवेळी लक्ष्मीला काय अर्पण करावे

  गृहस्थ कमळ, पांढरे फूल पूर्व
  शेतकरी पंचखाद्याचा नैवेद्य पश्चिम
  व्यापारी कमलाक्ष(कमलगट्टा)माळ पूर्वोत्तर
  विद्यार्थी धर्मग्रंथ, डाळिंब, तीळ उत्तर
  उद्योगपती कमलाक्ष(कमलगट्टा)माळ पश्चिम


  दिवाळीची पूजा हिंदू धर्मात खुप खास मानली जाते. दिवाळीला पुर्ण नियमांनी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने याचे शुभफळ संपूर्ण वर्षभर मिळते. लक्ष्मीची पूजा करताना काही खास गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप आवश्यक मानले जाते. यामुळे लक्ष्मी पूजा आणि पूजा यासंबंधीत या खास गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

  असे करा लक्ष्मीपुजन..
  1. दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी घराचा ईशान कोण म्हणजेच पूर्व-उत्तर दिशा निवडा. ही दिशा लक्ष्मी पूजनासाठी खुप खास मानली जाते.
  2. देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी पूजा बेडरुम किंवा किचन रुम बिल्कुल नसावी.
  3. पूजा कक्षाच्या भींती आणि फरशीचा रंग पांढरा, पिवळा किंवा फिकट नीळा खुप शुभ मानला जातो. असे नसल्यास या जागी या रंगाचा कपडा अंथरुन देखील पूजा करता येते.
  4. पूजन कक्षात हवन कुंड आग्नेय कोण म्हणजेच पूर्व-दक्षिण दिशेला असावे.
  5. पूजा करण्याची व्यवस्था अशी करा की, पूजा करताना कुटूंबातील लोकांचे मूख पूर्व उत्तर दिशेला असेल.
  6. पूजा घरात युध्द किंवा पशु पक्षांचे चित्र लावणे वास्तुसाठी शुभ मानले जात नाही.
  7. पूजेच्या वेळी डस्टबीन घराच्या ईशान कोण म्हणजेच पूर्व-उत्तर दिशेला किंवा पूजाकक्षाच्या आजूबाजूला असु नये.
  8. देवी लक्ष्मीची मूर्ति स्थापित करण्याअगोदर त्या ठिकाणी झाडून-पुसून घ्यावे आणि त्या जागेवर कुंकवाने स्वस्तिक काढावे, त्यावर लक्ष्मी देवीची मूर्ति स्थापित करावी.

  - दिपावली पूजनासाठी चौरंगावर लक्ष्मी व गणेशाची मूर्ती अशी ठेवा त्याचे तोंड पूर्व किंवा पश्चिम असावे.
  - लक्ष्मी, गणेशला डाव्या बाजूला ठेवावे. कलशाजवळ लक्ष्मीच्या दिशेने तांदूळ ठेवावे.
  नारळाला एका लाल कपड्यात गुंडाळून त्याचा पुढच भाग दिसेल असा कलशात ठेवा. हा कलश वरूणदेवाचे प्रतिक आहे.
  कलश ठेवल्यावर त्यावर दोन दिवे लावा. एका दिव्यात तूप व दुस-यात तेल घाला. एक दिवा चौरंगाच्या डाव्या बाजूला ठेवा व दुसरा दिवा मूर्तीच्याजवळ ठेवा. याचबरोबर गणेशाजवळही दिवा लावा.

Trending