Home | Khabrein Jara Hat Ke | Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी क्लिक झाले हे PHOTOS,आता या जगात नाहीत हे लोक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 01:41 PM IST

ही छायाचित्रे त्यांची शेवटची छायाचित्रे ठरली.

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death


  जगभरातील लोक फोटोज आठवणींचा ठेवा म्हणून क्लिक करत असतात. पण काही फोटोजमागची कहाणी ही अतिशय दुर्दैवी ठरु शकते, असे तुम्हाला सांगितले, तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का... होय, पण हे खरे आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती छायाचित्रे त्या संबंधित व्यक्तीच्या मृत्यूच्या अगदी काही क्षणांपूर्वी क्लिक झाली आहेत. दुर्दैवाने या फोटोजमधील व्यक्ती आज या जगात नाहीत. ही छायाचित्रे त्यांची शेवटची छायाचित्रे ठरली. वरील छायाचित्रात दिसणारी तरुणी मात्र याबाबतीत सुदैवी ठरली आहे. काय घडले होते तिच्यासोबत नेमके..


  काही पावलांवर उभा होता मृत्यू, सुदैवाने बचावली ही तरुणी ...
  रूसची राहणारी 22 वर्षीय जूलिया पोपोवचा हा फोटो तिचा अखेरचा फोटो ठरु शकला असता. दैव बलवत्तर म्हणून ही तरुणी बचावली. झाले असे, की 2009 साली काही चोर तिच्यासमोर चोरी करताना तिला आढळले. ती या घटनेने एवढी भांबावून गेली, की तडकाफडकी ती घरी पोहोचली. पण घरी पोहोचण्यापूर्वी या चोरांनी तिच्या मानेत चाकु खुपसला होता. पण घाबरलेल्या जूलियाला याचा थांगपत्ताच लागला नाही. घरी पोहोचल्यानंतर तिला तिच्या मानेत चाकु खुपसल्याचे समजले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा फोटो रुग्णालयातच क्लिक झाला आहे. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन मानेत 6 इंच फसलेला चाकू बाहेर काढला. दहा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जूलिया घरी परतली. पण समोर असलेला मृत्यू जूलियाने अनुभवला हे नक्की. पण पुढच्या स्लाईड्सवर तुम्ही ज्या व्यक्तींविषयी वाचणार आहात, ते मात्र जूलियासारखे लकी ठरले नाहीत. हे फोटोज त्यांचे अखेरचे ठरले.

  पुढील स्लाईड्सवर बघा, लोकांचे शेवटचे फोटो आणि वाचा त्यामागची दुर्दैवी कहाणी...

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  3 दिवस अडकली राहिली ही मुलगी, सर्वांसमोर झाला मृत्यू...

  1985 साली इंडोनेशियात  ज्वालामुखी स्फोटात अर्मेरो शहर उद्धवस्त झाले होते. ज्वालामुखींच्या लाटेत 13 वर्षीय ओमायरा सांचेज गर्जों फसली होती. त्या मुलीचे पाय कापल्याशिवाय तिला या दलदलीतून बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यावेळी तिथे हजर असलेल्या डॉक्टरांजवळ आवश्यक साहित्य नसल्याने तिला बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही. अखेर तिला तिथेच मृत्यू येण्याची सगळे वाट बघू लागले. तब्बल 60 तास ही मुलगी मृत्यूची वाट बघत राहिली. हा फोटो क्लिक झाल्यानंतर काही क्षणांतच ओमायराचा मृत्यू झाला होता.  

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  जेव्हा अचानक कॅमेरात कैद झाली आत्महत्येची घटना..

  चीनच्या वुहान यांग्तजे नदीवर बनलेल्या ब्रिजच्या किनारी काही लोक गप्पा मारत होते. तेव्हा तेथे हजर एक व्यक्ती फोटोज क्लिक करत होता. एका फोटोत त्याला एक सावली दिसून आली. झाले असे, की नकळत त्याच्या या फोटोज आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा फोटो क्लिक झाला होता.  

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  जेव्हा प्लेनवरुन घेतली या व्यक्तीने उडी...
  सिडनीहून उड्डाण झालेल्या जापान एअरलाइन्सच्या या फ्लाइटमध्ये एक व्यक्ती विना तिकिट बसला होता. मग अचानक त्याने विमान उंचावर गेल्यानंतर त्यातून उडी घेतली होती. दूर हजर असलेल्या एका व्यक्तीने ही घटना कॅमे-यात कैद केली होती.  

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  मृत्यूला हसतहसत स्वीकारले...
  या छायाचित्रात चेह-यावर हास्य असलेली ही व्यक्ती मृत्यूच्या अगदी काही पाऊल दूर होती. अमेरिकेने रुसच्या या गुप्तहेराला पकडले होते. त्यांनी त्याला जीवे मारले. पण मृत्यू समोर उभा असून देखील या व्यक्तीच्या चेह-यावर हास्य कामय होते. त्याने त्याचे शेवटचे छायाचित्र हसत हसत क्लिक करु दिले होते.  

   

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  जेव्हा लोकांनी भरलेल्या पूलात टाकले होते अॅसिड...

  हे छायाचित्र 1964 साली क्लिक झाले होते. कशाप्रकारे हॉटेलच्या मालकाने पूलमध्ये अंघोळ करत असलेल्या काळ्या लोकांवर अॅसिड फेकले, हे तुम्ही या छायाचित्रात बघू शकता. फोटोत दिसणारे लोक अखेरच्या क्षणापर्यंत ओरडत होते.  

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death


  क्लिक करुन झाला मृत्यू..
  हा फोटो रेय्नाल्डो दस्गा नावाच्या मुलाने क्लिक केला होता. तो त्याच्या फॅमिलीचा फोटो क्लिक करत होता. या फोटोत एक व्यक्ती तुम्हाला बंदुक हातात घेऊन उभा दिसतोय. या बंदुकधारी व्यक्तीने हा फोटो क्लिक करणा-या रेय्नाल्डोवर गोळी झाडून त्याचा जीव घेतला होता.  

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  पार्किंगमध्ये मिळाला हा फोटो, पण फोटोत दिसणारे लोक आहेत बेपत्ता...

  जून 1989मध्ये फ्लोरिडाच्या एका स्टोर पार्किंगमध्ये हा फोटो मिळाला होता. फोटोत दिसणारे हे लोक अखेर कुठे बेपत्ता झाले, ते कोण होते याचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागू शकला नव्हता. असे म्हटले जाते, की फोटोत दिसणारी 19 वर्षीय मुलीचे नाव तारा कैलिको होते.  1988 सालानंतर तिला कुणीही पाहिले नाही. 

 • Completely Shocking Photographs Of People Clicked Before The Death

  जमीनपासून काही फूट उंचावर अचानक आला मृत्यू...

  ऑक्टोबर 2013 मध्ये नेदरलँडमध्ये एक विंड टरबाइनची दुरुस्ती सुरु असताना त्यात अचानक आग लागली. त्यावेळी दोन इंजिनिअर त्यवर हजर होते. आग लागल्याचे बघून एकाने वरुन उडी घेतली. पण उंचावरुन उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुस-या व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.  

Trending