आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Composite Response To Strike, 249 Farmers' Associations And 80 Student Unions On The Road

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, 249 शेतकरी संघटना व 80 विद्यार्थी संघटना रस्त्यावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सरकारच्या कथित लाेकविराेधी आर्थिक धाेरणांच्या निषेधार्थ डावे समर्थक व १० केंद्रीय कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी बंद पुकारला हाेता. या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद िमळाला. देशभरात खासगी वाहनांची वाहतूक जवळपास ठप्प हाेती. वीज, बँकिंग तसेच इतर सेवा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. आैद्याेगिक क्षेत्र आणि प्रमुख बाजारपेठाही बंद राहिल्या. २४९ शेतकरी संघटना व ८० विद्यार्थी संघटना या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या हाेत्या.

हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आेडिशा, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्र प्रदेशसह इतर राज्यांत कामगारांनी धरणे तसेच सभा घेऊन संताप व्यक्त केला. बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातही बँकिंग, उद्याेग, परिवहन क्षेत्रातील कामगारही बंदमध्ये सहभागी झाले हाेते. त्यातही खासगी टॅक्सी सेवा संघटनांनी या बंदचे समर्थन केले.

कामगार संघटनांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा


राेजगार, सार्वजनिक रेशन, आराेग्य-शिक्षण, किमान राेजंदारी मासिक २१ हजार रुपये, कृषी मालास याेग्य दर, सर्वांना किमान १० हजार रुपये मासिक निवृत्तिवेतन इत्यादी मागण्या आंदाेलकांनी केल्या आहेत. त्याशिवाय नागरिकत्व कायदा, सार्वजनिक उपक्रमांतील खासगीकरण याेजना वापर घेण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.

'भारत बंद'च्या बाजूने विराेधात उतरले दिग्गज

भारत-बंद ही कामगार संघटनांकडून एक-दाेन वर्षांत केली जाणारी प्रक्रिया आहे, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आली आहे. काँग्रेसने या आंदाेलनाचे समर्थन केले आहे. तृणमूल काँग्रेसने संपावर टीका करताना सवंग लाेकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. माेदी सरकारची धाेरणे जनतेच्या विराेधात आहेत. देशातील २५ काेटींहून जास्त कामगार संपावर गेले आहेत. माेदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना कमकुवत करून त्या भांडवलदार मित्रांना विकू लागले आहे, असा आराेप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. माेदी सरकारच्या विराेधात रस्त्यावर उतरलेल्या २५ काेटींहून जास्त श्रमजीवींना माझा सलाम, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. डाव्या समर्थकांच्या संपाला जनतेने आधीच नाकारले आहे. बंद, संपाच्या माध्यमातून डावे समर्थक सवंग लाेकप्रियता मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते बसवर बॉम्ब फेकतात. अशा प्रकारे लाेकप्रियता मिळवणे याेग्य नाही. रेल्वे रुळांवर बॉम्ब पेरणे ही गुंडगिरी आहे. आंदाेलनाच्या नावावर प्रवाशांना मारहाण करणे, दगडफेक केली जात असल्याचा आराेप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. अशा दादागिरीचा मी निषेध करते, असे ममतांनी सांगितले.

कर्नाटकातील चिकमंगळूर येथे बुधवारी विविध मागण्यांसाठी बंद पाळण्यात आला. या वेळी जोरदार मोर्चा काढण्यात आला.
 

बातम्या आणखी आहेत...