आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मॉर्निंग वॉक’ करताना कचरा उचलण्याची संगणक अभियंत्याची चळवळ, प्लॉगिंगची पुणे महापालिकेकडून दखल व मदत

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात रुजतेय स्वीडनमधील ‘प्लाॅगिंग’ मोहीम
  • ४०० तरुणांचा सहभाग, ६ आठवड्यांत केले ३६,००० किलो प्लास्टिक गोळा

पुणे - भल्या पहाटे शहरवासीय मंडळी शारीरिक आरोग्यासाठी रस्त्याच्याकडेने धावताना दिसतात. मात्र, पहाटे शरीरस्वास्थ्यासाठी धावताना शहराची स्वच्छता करण्याची चळवळ पुण्यात सुरू झाली आहे. मूळची स्वीडन देशातील प्लॉगिंग संकल्पना म्हणजे प्लास्टिक कचरा उचलणे होय. हळूहळू भारतातील शहरांमध्ये ती उभी राहत आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्याबरोबर शहरही स्वच्छ करण्याची चळवळ पुण्यासह नाशिक नागपूर या सारख्या प्रमुख शहरांमध्ये रुजत आहे. सकाळी धावताना ‘कूल डाऊन अॅक्टिव्हिटी’दरम्यान सोबतच्या एका पिशवीत प्लास्टिक पिशव्या,रॅपर्स आदी कचरा गोळा केला जातो. विवेक गुरव या संगणक अभियंत्याने या चळवळीची बीजे पुण्यात रोवली. तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या सुटीचा काही वेळ सामाजिक कार्यात घालवता येईल का, असा विचार विवेक गुरवने केला. कार्यालयात पाच दिवसांच्या कामानंतर मनाला आणि शरीरालाही ताजेतवाने करण्यासाठी व्यायामाबरोबरच प्लास्टिक मुक्ती अभियानाची कास त्याने धरली. त्याने सुरू केलेल्या ‘पुणे प्लॉगर्स’ या उपक्रमातून अनेक तरुणांच्या मदतीने सहा आठवड्यांत ३६,००० किलो प्लास्टिक गोळा करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच टाकाऊ प्लास्टिकच्या काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी विनामूल्य महिलांना दिल्या जातात. शहर प्लास्टिक मुक्त व्हावे यासाठी विवेकने  पुढाकार घेत पुण्यातील तरुणांना प्लॉगर उपक्रमाची माहिती दिली. ऑक्टोबरमध्ये प्लॉगिंग चळवळ सुरू केली. गेल्या काही आठवड्यांत हिंजवडी, वाकड, दिघी, आळंदी, शिवाजीनगर परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. पुणे महानगरात सध्या या उपक्रमात एकाच वेळी ४०० तरुण सहभाग घेतात तसेच शहराच्या उपनगरांमध्येही प्लाॅगर एकत्र येऊन परिसर स्वच्छ करत आहेत. संयुक्त राष्ट्र,आयआयटी दिल्लीच्या पुरस्काराने गौरव

प्लास्टिक कचरामुक्तीबाबत जनजागृती केल्याबद्दल विवेकला नुकताच इंडियन कॉन्फेडरेशन ऑफ एनजीओज आणि संयुक्त राष्ट्रे (युनो) यांच्यातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात कर्मवीर चक्र पुरस्कार दिला तसेच आयआयटी दिल्ली येथे प्रतिष्ठीि ‘ग्लोबल यंग लीडर फेलोशिप’ पुरस्काराने ही त्याला सन्मानित करण्यात आले आहे.

प्लॉगिंगची पुणे महापालिकेकडून दखल व मदत

प्लॉगिंग या संकल्पनेत रिकाम्या हाताने धावण्यापेक्षा हातात पिशवी घेऊन धावतात आणि वाटेतील कचरा त्या पिशवीत गोळा करतात. विवेक गुरवच्या या कामाची दखल पुणे महानगरपालिकेनेसुद्धा घेतली आहे. दर रविवारी पुण्यातील नदीपात्रातील कचरा उचलण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...