आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात मारहाण प्रकरणी हे.काॅ. चव्हाण निलंबित; रेशन दुकानदाराला मारहाण करणे भाेवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- एका रेशन दुकानदाराला मारहाण केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे थेट पोलिस ठाण्यात जाऊन बसल्याची घटना २७ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल देविदास चव्हाण याला पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

 

रुईखेड टेकाळे येथे रास्त भाव दुकान असलेले संजय पूर्णाजी टेकाळे व बुलडाणा येथील रास्त भाव दुकानदार रमेश परसे यांचा आपसातील आर्थिक संबंधातून वाद होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल होती. याच तक्रारीवरून संजय टेकाळे हे २७ डिसेंबर रोजी पोलिस स्टेशनला गेले होते. या वेळी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आमदार हर्षवर्धन सपकाळ हे पोलिस ठाण्यात जाऊन बसले होते. त्यांनी सीसीटीव्हीत बघा मारहाण करण्यात आली की नाही. की मारहाण करताना सीसीटीव्ही बंद करता, असा प्रश्न करत पोलिसावर कारवाईची मागणी केली होती. अखेर पोलिस अधीक्षकांनी देविदास चव्हाण याला शुक्रवारी निलंबित केले.

 

बातम्या आणखी आहेत...